• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

शून्यातून विश्व निर्माण करणारे ध्येयवेढे अष्टपैलू व्यक्तिमत्व: श्री नरहर मुदगलराव जोशी चाकूरकर

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
July 5, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अभय मिरजकर , लातूर

जिद्द असेल तर मार्ग सापडतो” आणि “कष्टाविना फळ नाही”या म्हणी आपण नेहमी ऐकतो, पण या म्हणींना आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री नरहर मुदगलराव जोशी चाकूरकर. ८ डिसेंबर १९३७ रोजी सुपा (ता. गंगाखेड) येथे जन्मलेल्या नरहररावांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षातून यशाकडे, कलेकडून संस्कृतीकडे आणि प्रपंचाकडून परमार्थाकडे झालेला एक थक्क करणारा प्रवास आहे.

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी पितृछत्र हरवलेल्या नरहररावांसमोर आभाळ फाटले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी परभणी, चाकूर आणि उदगीर येथे शिक्षण घेतले. कधी माधुकरी मागून तर कधी वार लावून त्यांनी आपला उदरनिर्वाह केला. शिक्षणाची तळमळ पाहून उदगीर येथे वैद्यकीय अधिकारी असलेल्या बाळकृष्ण देशपांडे यांनी त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले.

         म्हणतात ना, “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे”. त्यांच्या जन्मांध आईच्या सुरेल आवाजातून आणि मामांच्या संस्कारातून त्यांच्यावर संगीताचे पहिले बीजारोपण झाले. 

संगीताला त्यांनी आपला ‘आत्मा’ मानले. संगीताचे अधिकृत शिक्षण न घेताही त्यांनी बासरी वादन आत्मसात केले. केवळ बासरीच नव्हे, तर हार्मोनियम, तबला, बुलबुल तरंग आणि दिमडी ही वाद्येही ते लीलया वाजवू लागले. त्यांच्याकडे २५ विविध प्रकारच्या बासऱ्यांचा दुर्मिळ संग्रह आहे. संगीताची ओढ इतकी की शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी ते खास पुण्यात जात असत. त्यांच्या संग्रहात १,००० हून अधिक कॅसेट्स आणि ५५० पेक्षा जास्त सीडी आहेत . अहमदपूर येथे ‘साहित्य संगीत कला अकादमी’ स्थापन करून त्यांनी सलग ७ वर्षे कोजागिरी संगीत उत्सव साजरा केला आणि ग्रामीण भागात कलेची ज्योत पेटवली.

             “विद्येविना मती गेली…” या उक्तीचे महत्त्व ओळखून त्यांनी डी.एड., बी.एड., एम.एड. आणि एम.ए. मराठीची पदवी संपादन केली. विशेष म्हणजे, सेवानिवृत्त झाल्यावर वयाच्या उत्तरार्धात त्यांनी इतिहास विषयात एम.ए. केले. परीक्षेत जेव्हा परीक्षकांनी त्यांना ‘पालक’ समजून बाहेर जाण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी “मीच परीक्षार्थी आहे”असे सांगत सर्वांना थक्क केले. गुणपत्रिका देताना प्राचार्यांच्या हस्ते त्यांचा खास सत्कार करण्यात आला.

‘मुख्याध्यापक’ म्हणून लोदगा ता. औसा येथे कार्य करताना त्यांनी आपल्या केंद्राला तालुक्यात प्रथम क्रमांकावर नेले. १९९१ मध्ये जनगणनेच्या त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपतींच्या ‘रजत पदकाने’ सन्मानित करण्यात आले. १७ वर्षे त्यांनी अध्यापक विद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काम केले. औसा तालुक्यातील लोदगा, धाराशिव, परंडा, अहमदपूर येथे ज्ञानदानाचे काम केले.

नरहरराव केवळ पुस्तकी कीडा नव्हते. “निरोगी शरीरात निरोगी मन वसते” यावर त्यांचा ठाम विश्वास होता. बॅडमिंटन, शटल कॉक, टेबल टेनिस, कॅरम आणि व्हॉलीबॉल अशा विविध खेळांत त्यांनी प्राविण्य मिळवले. स्वतः खेळत असतानाच इतरांनाही प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी  अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजनही  केले.

 *जिज्ञासेचा खजिना: 

१०८ चिकाटबुकांचा संग्रह* 

“वाचाल तर वाचाल” या म्हणीला त्यांनी नवा अर्थ दिला. ज्ञान जेथे मिळेल तिथून ते गोळा करण्यासाठी त्यांनी ‘चिकटबुक’ (Scrapbook) उपक्रम राबवला. त्यांच्याकडे आज तब्बल १०८ पेक्षा जास्त चिकटबुके आहेत. यामध्ये अध्यात्म, विज्ञान, पाककला, साहित्य, औषधी वनस्पतींपासून ते मराठीच्या ९६ लोकभाषांपर्यंतचा दुर्मिळ ज्ञानाचा ठेवा संग्रहित आहे. हा संग्रह म्हणजे एखाद्या चालत्या-बोलत्या विश्वकोशासारखाच आहे.

          मराठी सह विविध प्रकारच्या ग्रंथांचा संग्रह, पोथ्या, पुराण यांचा संग्रह त्यांनी निर्माण केला. टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना त्यांनी स्वतः राबवली. आपल्या संग्रहातील ७०० पेक्षा अधिक ग्रंथ, पुस्तके त्यांनी आकर्षक पध्दतीने सजवली . त्यासाठी घरी आलेल्या लग्न पञिका, चहा, बिस्किटे यांचे प्लास्टिक, चाॅकलेटचे वरचे पेपर वापरले.

 *अध्यात्मिक साधना आणि भाषेचे पावित्र्य* 

प.पू. गुळवणी महाराजांकडून शक्तीपात दीक्षा घेतली . गुरुबंधू दत्त कविश्वर यांच्या कडून योगसाधना शिकली. इंचगिरी संप्रदायाचे मल्लेश्वर महाराज यांच्याशी संपर्क आला . उन्हाळ्यातील सुट्टी, दिवाळी सुट्टी आणि श्रावण महिन्यातील सुट्टी घेऊन 

त्यांनी सज्जनगड, केदारनाथ, बद्रीनाथ, जोशीमठ, रामकृष्ण परमहंस मठ, विवेकानंद स्मारक कन्याकुमारी, येल्लोरी अशा विविध ठिकाणी २१ -२१ दिवसांची खडतर साधना केली. 

     १९७९ मध्ये बार्शीत अध्यात्म आश्रमाची स्थापना केली. गुरुंच्या आदेशानुसार सदगुरू म्हणून अनेकांना नाम दिक्षा देण्याचे काम त्यांनी केले. 

मराठी भाषेबद्दल त्यांना सार्थ अभिमान आहे. “माझ्या मराठीची बोलु कौतुकें…” ही ओळ सार्थ ठरवत त्यांनी आरत्या, मंत्र आणि श्लोकांचे उच्चारण शास्त्रोक्त पद्धतीचा आग्रह धरला आणि त्याचे प्रशिक्षणही दिले.

आज वयाच्या ९० व्या वर्षीही नरहरराव कोणावरही विसंबून नाहीत. “म्हातारा इथं कोण आहे?”असा प्रश्न पडेल इतका त्यांचा उत्साह आहे. चष्म्याशिवाय मोबाईल वापरणे आणि वाॅट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून जगाशी जोडून राहणे, ही त्यांच्या प्रगत विचारांची पावतीच आहे. आजही ते या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात.

गदिमांच्या ओळींप्रमाणे- “तुझे आहे तुजपाशी … नरहररावांनी स्वतःमध्ये दडलेल्या अनेक कलांना जागृत केले आणि जोपासले. शून्यातून विश्व निर्माण करून त्यांनी स्वतःला एक आदर्श शिक्षक, कुशल खेळाडू, संवेदनशील गायक आणि निष्ठावान साधक म्हणून सिद्ध केले आहे. त्यांचे हे जीवनकार्य येणाऱ्या अनेक पिढयांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. “मूर्ती लहान पण कीर्ती महान”अशा या व्यक्तिमत्वास मानाचा मुजरा !

Previous Post

महावितरणचे ‘स्मार्ट’पाऊल, योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

महावितरणचे ‘स्मार्ट’पाऊल, योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

July 2, 2026

राज्यपालांच्या हस्ते ‘अटल संस्मरण’ ग्रंथाचे प्रकाशन; अटलजींचे जीवन नेतृत्व, शालीनता आणि मूल्यांचा आदर्श – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

July 1, 2026

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026

श्रेयवादाच्या राजकारणात अडकले लातूरचे नाट्यगृह; नाट्यकर्मींचा संयम आता संपत चालला! पालकमंत्री यात लक्ष घालतील का…!

June 26, 2026

Recent News

महावितरणचे ‘स्मार्ट’पाऊल, योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

July 2, 2026

राज्यपालांच्या हस्ते ‘अटल संस्मरण’ ग्रंथाचे प्रकाशन; अटलजींचे जीवन नेतृत्व, शालीनता आणि मूल्यांचा आदर्श – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

July 1, 2026

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026

श्रेयवादाच्या राजकारणात अडकले लातूरचे नाट्यगृह; नाट्यकर्मींचा संयम आता संपत चालला! पालकमंत्री यात लक्ष घालतील का…!

June 26, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

श्रेयवादाच्या राजकारणात अडकले लातूरचे नाट्यगृह; नाट्यकर्मींचा संयम आता संपत चालला! पालकमंत्री यात लक्ष घालतील का…!

June 26, 2026

🌧️ पावसाची प्रतीक्षा संपली; मुंबईत मान्सून दाखल, महाराष्ट्रासाठी शुभ संकेत

June 23, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved