

अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी संलग्न श्री. स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नाशिक येथील जागतिक कृषी महोत्सवांत श्री. स्वामी समर्थ कृषी केंद्राचे प्रमुख आबासाहेब मोरे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी सचिव उदयजी देवळाणकर यांच्या हस्ते ‘कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारा अधिकारी’ लातूर येथील कृषी पर्यवेक्षक सूर्यकांत बाबुराव लोखंडे यांना कृषी माऊली पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बायफ चे मुख्य कार्यक्रम अधिकारी संजय पाटील, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ हेमराज राजपूत, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, कृषी संचालक जगदीश पाटील उपस्थित होते.
कमी खर्चात अधिक उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार, सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती, विविध प्रशिक्षणामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शासनाच्या योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे, आत्महत्याग्रस्त व अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबास शासनाच्या योजनेतून आर्थिक मदत मिळवून देणे यासारख्या शेतकरी हिताच्या कार्याबद्दल जागतिक कृषी महोत्सवात सूर्यकांत लोखंडे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

