-
लातूर, दि.२०, सामाजिक कार्यकर्ते हेच आपल्या सामाजिक लोकशाहीचे खरे रखवालदार आहेत असे प्रतिपादन, रामकुमार रायवाडीकर यांनी केले. ते २० फेब्रुवारी रोजी वैशाली चौक लातूर येथे, दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या संजिवनीताई चिकाटे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त, आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री श्याम वरियाणी हे होते.
यावेळी बोलतांना रामकुमार रायवाडीकर हे पुढे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ता एक प्रकारे जागल्या असतो. त्याच्या दक्षतेवर येथील सत्ता, प्रशासन आणि समाजाची वाटचाल अवलंबून असते. कार्यकर्ता हा परिपूर्ण व सजग नसेल तर, स्वातंत्र्य वा लोकशाहीला अर्थ प्राप्त होत नाही. देशात आज हितसंबंधी प्रशासन व भ्रष्ट सत्ताधा-यांची युती आहे. त्यांनीच येथील लोकशाही स्वातंत्र्य आणि संविधानाला सुरंग लावले आहे. या राष्ट्र व मानवताविरोधी संकटाचा पाडाव करणे हे, आपल्या प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. भारत देशामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता म. गांधी या, दोन राष्ट्रीय महापुरुषांना, स्त्री - पुरुष कार्यकर्त्यांचे अमाप बळ लाभले. याचे प्रमुख कारण म्हणजे, त्यांचे ज्ञान आणि चारित्र्य हेच होते, असेही रायवाडीकर म्हणाले. प्रारंभी दिवंगत संजिवनीताई चिकाटे यांच्या प्रतिमेस, कुटुंबियांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, त्यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. प्रविण चिकाटे यांनी केले. तर संकेत होळीवर यांनी सूत्रसंचालन केले. आणि सुमेशकुमार चिकाटे यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी सदाशिवराव काटे, दिपक कांबळे, सुरैय्या रायवाडीकर, उज्वला कांबळे, गोपाळराव चिकाटे, अंजली होळीकर, दैवशाला काटे, छाया मिसाळ, मंजूषा कांबळे, दिपक काटे, विजय कांबळे, संध्या होळीकर, शोभा भुताळे, सूरज पाटील, वर्षा कांबळे, संजय व्यवहारे, शोभा मस्के, निशा कांबळे, गणपतराव तेलंगे, उत्तम भुताळे आदी उपस्थित होते.
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...