
लातूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचे विचारपीठ भूमिपुत्र स्वराज्य शिवयोध्दा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बहुजन प्रतिपालक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या शिवजयंती निमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था सन्मान उपक्रमात या वर्षी शहरातील मंत्री नगर मधील छत्रपती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी गेली 15 वर्षापासून रक्तदान शिबीराचे आयोजन करुन अडीच हजार रक्तदाते निर्माण केले. याची दखल घेत या संस्थेस भूमिपुत्र सामाजिक बांधिलकी पुरस्कार छत्रपतीचे 13वे वंशज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले (लातूर जिल्हा पालकमंत्री) यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष बालाजी बाबासाहेब गवळी यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहाराने सन्मानित करण्यात आले.

आजपर्यंत आम्ही केलेल्या संस्थेच्या माध्यमातून च्या कार्याचा हा आमचा पहिला पुरस्कार गौरव तो ही छत्रपतीचे वंशज भोसले यांच्या हस्ते सन्मान घेऊन आम्ही धन्य झालो, असे विचार बालाजी गवळी यांनी व्यक्त केले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजयकुमार सुर्यवंशी हे होते तर प्रमुख पाहुणे जयंती उत्सवाच्या अध्यक्षा सौ. शोभाताई पाटील, संयोजक रविराज घोडके, उपाध्यक्ष गंगाधर इबितदार, अंकित बाहेती, गोविंद सुर्यवंशी, नागेश टेंकाळे, संजय ठाकूर, पांडुरंग पवार, किरण कुलकर्णी, गणेश साळुंके, चंद्रकांत वाघमारे, विवेक साळुंके, बाबुराव बिराजदार, रोहित ठाकूर, धिरज राठोड, महेश बेताळे, पैंगबर शेख, संजय राठोड, संजय हाळे आदि सह संस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

