
लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करत लाईनमन दिवस उत्सहात साजरा
लातूर, दि. ४मार्च : वीज सेवेच्या क्षेत्रातील लाईनमन हा महावितरणचा चेहरा आहे. घरोघरी प्रकाश देणारा दुवा असल्याने लाईनमनने आपल्या सुरक्षेला प्राध्यान्य देत ग्राहकाभिमूख सेवा देण्याच काम करत कंपनीच्या आर्थिक स्थैर्यासाठी संपुर्ण कार्यक्षमतेने कार्यरत रहावे असे विचार व्यक्त करत मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी तिसऱ्या लाईनमन दिनाच्या सर्व लाईनमन-वुमनला शुभेच्छा दिल्या.
लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एमआयडीसी परिसरातील उद्योग भवन येथे आज (दि. ४ मार्च ) लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. कार्यकारी अभियंता गणेश सामसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर,सहायक महाव्यवस्थापक चेतन वाघ, उपकार्यकारी अभियंता ज्योती कुमठेकर, सुबोध डोंगरे, श्रीशैल्य लोहारे, शैलेश पाटील व विद्युत निरिक्षक श्री बिराजदार यांच्या प्रमूख उपस्थितीत लातूर विभागातील सर्व लाईनमनना पुष्पगुच्छ देवून व हॅडी स्पिकर देवून मोठया उत्सहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अभियंता अरविंद बुलबुले म्हणाले की, वीजसेवा देत असताना किंवा वीजपुरवठा सरळीत करत असताना बहुतांशी लाईनमन शॉर्टिंग रॉडचा वापर करत नाहीत परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करावा. यामुऩे किमान ८० टक्के अपघात टाळता येतात. अपघात विरहीत सेवे बरोबरच कार्यक्षमता अबाधीत ठेवत आपल्या परिमंडळाची वसुली क्षमता वाढवायची आहे. त्याद्ष्टीने नियोजनबध्द काम करत सांघिक कार्यालयाने दिलेले लक्ष्य साध्य करायचे आहे. असे सांगत मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी संपुर्ण कार्यक्षमतेने ग्राहक सेवा देत थकबाकीसह चालू वीजबील वसुल करा असे आवाहन केले.
याप्रसंगी सुरवातीला उपकार्यकारी अभियंता शैलेश पाटील तसेत विद्युत निरिक्षक श्री बिराजदार यांनी विद्युत सुरक्षेबाबत काय काळजी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर याप्रसंगी काही लाईनमननी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक प्रमोद कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपकार्यकारी अभियंता ज्योती कुमठेकर यांनी केले. याप्रसंगी लातूर विभागातील असंख्य लाईन्मन व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

