
लातूर,: एंजल वन च्या सहकार्याने राह फाऊंडेशन महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये रोजगार मेळावा आयोजित करत आहे. राह फाउंडेशन आणि स्वयंतेज अकॅडमी लातूर यांच्या सहयोगातून लातूर मध्ये 6 मार्च ला हा मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील 15 कंपन्यांचा सहभाग होता, आणि लातूर मधील 90 हून अधिक युवक व युवतींनी मुलाखत प्रक्रियेत भाग घेतला. राह फाउंडेशिच्या अंतर्गत स्वयंतेज अकॅडमी, लातूर सेंटरच्या 11 व्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रमाणपत्र समारंभ व
नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी 5 पर्यंत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचा आयोजन
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या रूपात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्र पेठ येथील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अनिल जयभाये, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. सितम सोनवणे उपस्थित होते. याव्यतिरिक्त, राह फाऊंडेशनचे वरिष्ठ अधिकारी मोहन राठोड आणि स्वयंतेज अकादमी लातूर केंद्राचे केंद्र संचालक आकाश सोनकांबळे यांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रमाणपत्र वितरण आणि विशेष उल्लेख
कार्यक्रमात 11 व्या बॅचमधील 27 विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याशिवाय, सिद्धार्थ कांबळे, अश्विन साखरे आणि आझम पठाण यांना कंपन्यांना आकर्षित करण्याच्या त्यांच्या समर्पणासाठी विशेष पावती देण्यात आली. तसेच, वैष्णवी मोरे आणि अर्पिता बिराजदार यांनी उमेदवारांशी समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रेणुका होनकर आणि प्रतीक्षा सवासे यांनी केले. प्रशिक्षक किशोर महाजन आणि सूर्योदय बोईनवाड यांनी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. विशेष उल्लेखनीय आहे पूजा कांबळे या स्वयंसेविकेचे, जिने 5 व्या बॅचमधील विद्यार्थिनी मनीषा पवारच्या प्रेरणादायी यशोगाथा सांगितली.
प्रा. डॉ. सितम सोनवणे यांचे भाषण
प्रमुख पाहुण्यांपैकी एक असलेले प्रा. डॉ. सितम सोनवणे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना “अपयश पचवायला शिका, कारण जे अपयश सहन करून मेहनत करत राहतात त्यांनाच यश मिळते,” असे प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
हा कार्यक्रम राह फाऊंडेशन आणि स्वयंतेज अकादमीच्या दोन्ही संस्थांच्या समन्वय आणि सामूहिक प्रयत्नांचा परिणाम होता. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने मोठे मोलाचे मार्गदर्शन आणि संधी मिळाल्या.
या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून लातूर मधील युवक आणि युवतींना करियरच्या दिशेने एक मोठा पाऊल उचलण्याची संधी दिली आहे.

