राजर्षी शाहू कॉलेजने उच्च न्यायालयाच्या व स्कूल प्राधिकरणाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली

लातूर: दि. येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे निवृत्त शिक्षकाचे वेतन व लाभ देण्यासाठी शाहू कॉलेज टाळाटाळ करत आहे. शाहू कॉलेजचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर आणले त्याच विषयाच्या शिक्षकाला शाहू कॉलेजची 31 वर्ष इमाने इतवारे सेवा करून व वयोमानानुसार सेवानिवृत्त होऊनही वेतन व लाभ देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.
शाहू कॉलेजचे क्रॉप सायन्सचे (पीक शास्त्र) सेवानिवृत्त शिक्षक बालाजी व्यंकट झाडके हे गेली अनेक वर्षापासून वेतन व लाभासाठी कॉलेजमध्ये चकरा मारत आहेत मात्र त्यांचे वेतन व लाभ देण्यासाठी जाणून बुजून न्यायालयाची भीती दाखवून वेतन व लाभ घेण्यासाठी शाहू कॉलेज टाळाटाळ करीत आहे.उच्च न्यायालयाचे व स्कूल प्राधिकरणाचे आदेश डावलून शाहू कॉलेज मात्र वेतन व लाभ देण्यासाठी चाल ढकल करत आहे. मी व माझे कुटुंब अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून जात आहोत. त्यामुळे मी 17 मार्च रोजी शाहू कॉलेज लातूर येथे आमरण उपोषण करून जीवन संपवणार आहे. अशी माहिती निवृत्त शिक्षक बालाजी व्यंकट झाडके यांनी यश टावर्स येथील अल्फा क्लासेस येथे 15 मार्च रोजीच्या पत्रकार परिषदेत दिली.

