दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

माजी महापौर विक्रांत विक्रम गोजमगुडे यांचा अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…

लातूर शहराच्या राजकीय पटावर आज प्रचंड उलथापालथ झाली आहे. लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि काँग्रेसचे दमदार युवा नेते म्हणून ओळखले...

🌸 “विसावा” — सामाजिक विषमतेच्या वेदना सांगणारं प्रभावी नाटक 🌸

समीक्षण : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर 64 वी राज्य नाट्य स्पर्धा रंगात आली aaaun लातूर केंद्रावर प्रेक्षकांची गर्दी...

✨✨ ‘घाट’ — मृत्यूच्या शांततेतून जगण्याचा आरसा दाखवणारी प्रभावी नाट्यकृती ✨.

समीक्षण: दिपरत्न निलंगेकर, संपादक दैनिक युतीचक्र कै. ग्यानोबा शिवराम कोटंबे बहु. सेवा संस्था, हिप्पळनेर प्रस्तुत... माणसाच्या आयुष्यातील जन्म-मृत्यू हा अटळ...

🌿 लातूर केंद्रावरील ६४वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा — ‘रातमतरा’ नाट्यसमीक्षा 🌿

नाट्य समीक्षा दिपरत्न निलंगेकर, संपादक दैनिक युतीचक्र लातूर केंद्रावरील राज्य नाट्यस्पर्धेच्या ६४व्या पर्वात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रंगमंचावर सादर झालेलं ‘रातमतरा’ हे...

🌳 लातूर महापालिकेच्या परवानगीने 25 वर्ष जुन्या वृक्षाची कत्तल : पर्यावरण संरक्षण कायद्यांची उघडपणे पायमल्ली! 🌳

लातूर शहरातील बोधेनगर परिसरात तब्बल २५ वर्षांपासून उभा असलेला फिरंगी चिंचेचा प्रचंड वृक्ष एका व्यक्तीने सरळ बोडके करीत केवळ खोड ठेवत संपूर्ण...

🔴 लातूरचा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मुद्दा ऐरणीवर!सरकारच्या आढावा बैठकीत अकोला–यवतमाळला ‘तातडी’, पण लातूरचा जीव वाचवणारा प्रकल्प का रखडतो?

मुंबई, दि. १९ – अकोला आणि यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये खासगी भागीदारी तत्वावर तत्काळ सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष...

🔥 लातूर–बीड शिक्षण विभागात भूकंप! शिक्षणाधिकाऱ्यावर अनियमिततेचे आरोप – शासनाचा झंझावाती निलंबन आदेश! 🔥

लातूर/मुंबई, दि. 19 नोव्हेंबर 2025शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज वीजेच्या गतीने कारवाई करत जि.प. बीडचे तत्काळीन माध्यमिक शिक्षणाधिकारी व...

दारूच्या बाटल्यांचा खच गांडूळ खत प्रकल्पात! — “आता बाटल्यांपासून खत बनवणार का?” संतप्त लातूरकरांचा सवाल…

लातूर :लातूर महानगरपालिकेच्या गांडुळ खत निर्मिती प्रकल्पात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याने लातूरकर संतप्त झाले आहेत. “कचऱ्यापासून खत बनवणाऱ्या प्रकल्पात दारूच्या बाटल्यांचा...

🎭 ‘अंतरछिद्र – द ब्लॅक होल’ : मानवी अंतःकरणाचा अस्थिर प्रकाश शोधणारे गूढ-गंभीर नाटक 🎭—

नाट्यसमीक्षण : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या लातूर केंद्रावर दर्पण मराठी पत्रकार संघ, लातूरने...

घनकचरा व्यवस्थापन कामाची आयुक्त श्रीमती मानसी यांच्याकडून पाहणी

लातूर/प्रतिनिधी : शहर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना ( बारवाल ) यांनी  स्वच्छता विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन वरवंटी कचरा डेपो...

Page 10 of 72 1 9 10 11 72
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News