
लातूर :
लातूर शहर महानगरपालिका सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 9 या आदर्श शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे यांची अचानक बदली करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त करत शाळा बंद करून थेट रस्त्यावर धरणे आंदोलन सुरू केले.
हीच ती शाळा आहे जिच्यावर शहराचा अभिमान मानला जातो. या शाळेला केंद्र सरकारकडून पीएमश्री शाळा म्हणून बहुमान प्राप्त झाला आहे. शिक्षणक्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या या शाळेत शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करण्यात मुख्याध्यापक शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे पूर्वी त्यांच्याच कालावधीमध्ये या शाळेला दहावीचा वर्ग देखील मंजूर करण्यात आलेला होता शाळेचा झपाट्याने होणारा विकास त्यांच्या हातावरती वाढणारी विद्यार्थ्यांची संख्या ही दखलपात्र अशीच आहे.

🔎 पालक व विद्यार्थ्यांची भूमिका :
पालकांचे म्हणणे आहे की, “मुख्याध्यापक शिंदे यांच्यामुळे शाळेत काटेकोर शिस्त आली. मुलांमध्ये आत्मविश्वास, अभ्यासाकडे ओढ आणि सांस्कृतिक जाणीवा वाढल्या. एवढे यश मिळवून दिलेल्या मुख्याध्यापकांची केवळ सव्वा वर्षांत बदली होणे हा सरळ अन्याय आहे.”
🎯 नियमांचा भंग :
शासनाच्या परिपत्रकानुसार, पीएमश्री शाळांमधील मुख्याध्यापकांची किमान 5 वर्षे बदली होऊ नये अशी अट आहे. तरीसुद्धा केवळ सव्वा वर्षांतच मुख्याध्यापक शिंदे यांची बदली करण्यात आली. हा प्रकार शासनाच्या स्वतःच्या नियमांना हरताळ फासणारा असून शिक्षणाबाबत असलेली असंवेदनशीलता अधोरेखित करणारा आहे.

🚨 आंदोलनाची ठिणगी :
मुख्याध्यापकांच्या बदलीविरोधात आज सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांनी शाळे समोर धरणे देतं काही काळ शाळा बंद केली. “मुख्याध्यापक परत द्या” अशा घोषणा देत पालक-विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन छेडले. शाळा ठप्प झाल्यामुळे शिक्षणावरही तातडीने परिणाम होईल ही बाब लक्षात येतात महानगरपालिकेचे काही कर्मचारी यासोबतच गांधी चौक पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी या परिसरात दाखल झाले यांच्या मध्यस्थीच्या नंतर रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या मुलांना शाळेच्या वर्गामध्ये नेऊन बसवण्यात आले.

💥
- पीएमश्री शाळेला दिलेल्या मानाचा आदर का राखला जात नाही?
- सव्वा वर्षांतच शिस्तप्रिय मुख्याध्यापक का हटवले गेले?
- विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी घडवलेल्या वातावरणाचा बळी कोणाच्या आदेशाने घेतला जात आहे?
- शिक्षणाचे राजकारण करणाऱ्यांमुळे मुलांच्या भविष्यास कोण जबाबदार?
लातूर शहरातील ही एकमेव पीएमश्री शाळा आज बदलीच्या निषेधार्थ बंद असल्याने जिल्हा प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पालक व विद्यार्थ्यांच्या रोषामुळे या प्रकरणाचे वेळेत निराकरण झाले नाही, तर हे आंदोलन आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.

