
लातूर – मराठवाड्यात मे महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे व सामान्य जनतेचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. उभ्या पिकांचे नुकसान, शेतजमिनी खरडून जाणे, घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू यामुळे नागरिक संकटात सापडले असताना सरकार मात्र गाढ झोपेत असल्याचा घणाघात शेतकरी कामगार पक्षाने केला आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देऊन शेतकरी कामगार पक्षाने स्पष्ट मागणी केली की,
👉 ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा!
👉 शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50 हजारांचे अनुदान द्या!
👉 मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ₹20 लाख मदत द्या!
👉 शेतकऱ्यांचे वीजबिल व कर्ज माफ करा!
👉 शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी माफ करा!
👉 बँका व वित्तीय संस्थांची वसुली थांबवा!
👉 जनावरांच्या नुकसानीसाठी पशुधन खरेदीस मदत द्या!
“शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनता जगण्यासाठी झगडतेय… अशा वेळी विकासकामांची ढोंगबाजी थांबवून सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू!” असा भडक इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना हे निवेदन भाई उदय गवारे, अॅड. सुशील सोमवंशी, अॅड. भालचंद्र कवठेकर, भाई अमर देशमुख, अॅड. जैनुद्दिन शेख, सोहम कवठेकर, ओमप्रकाश आर्य, सतीश देशमुख, रत्नजीत जाधव, शिवाजी लोखंडे, वैजनाथ क्षीरसागर यांच्या शिष्टमंडळाने दिले.
⚡ शेतकरी कामगार पक्षाच्या या इशाऱ्यामुळे आता सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे! ⚡

