
लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली औसा पोलीस स्टेशन येथे कुणाल कामरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले .
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की कुणाल कामरा यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या बद्दल सुपारी घेऊन सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब बद्दल अपशब्द वापरलेले आहेत. उद्धव ठाकरे गटाने त्याला एकनाथ शिंदे साहेब यांच्या बद्दल अपशब्द वापरण्यासाठी भाग पाडलेल आहे. परंतु या वक्तव्यामुळे सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या बद्दल अपमान कारक जे काव्य कामरा यांनी केलेल आहे हे अत्यंत चुकीचे असून निंदनीय आहे .कुणाल कामरा यांचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत .कुणाल कामरा यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असून शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे .कुणाल कामरा याला तात्काळ अटक करून योग्य ते कारवाई करण्यात यावी अन्यतः कुणाल कामरा महाराष्ट्रात फिरू शकणार नाही आणि त्याला सुपारी देणारे हे सुद्धा फिरू शकणार नाहीत .ही सर्वस्व जबाबदारी आता पोलीस प्रशासनावर असून पोलीस प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाही करून पुढील अनर्थ टाळावा अन्यथा कुणाल कामरा दिसेल तिथं त्याचा योग्य तो शिवसेना स्टाईलने समाचार घेतला जाईल असे उद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी काढले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे ,तालुकाप्रमुख भगवान जाधव ,तालुका प्रमुख विकास शिंदे ,तालुकाप्रमुख धनराज बिरादार, महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चना ताई बिरादार ,कामगार सेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील कामगार सेनेचे जिल्हा उपप्रमुख किरण सोमवंशी, उपतालुकाप्रमुख सहदेव कोळपे ,काशिनाथ जेटनवरे, शिवराज क्षीरसागर, बाळासाहेब कांबळे ,असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

