
: लातूर महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले सादर… १७ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक; करवाढ नाही

: लातूर महानगरपालिकेचे २०२५ – २६ चे मूळ अंदाजपत्रक आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आज सादर केले. यात कोणत्याही प्रकारची करवाढ सुचविण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. हे अंदाजपत्रक १७ लाख रुपये शिल्लकीचे आहे. महापालिका आयुक्त यांनी आज २०२४ – २५ चे सुधारित आणि २०२५ – २६ चे मूळ अंदाजपत्रक सादर केले. यात नवीन आर्थिक वर्षात १०६४ कोटी ७ लाख रुपये अपेक्षित जमा दाखविण्यात आली असून, १०६३ कोटी ९० लाख रुपये अपेक्षित खर्च आहे. लातूर शहराच्या गरजा ओळखून आवश्यक त्या सोयीसुविधा नागरिकांना सहजतेने उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने तयार करून सादर करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.





यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त उपायुक्त सर्व विभागाचे प्रमुख कर्मचारी यांची उपस्थिती सभागृहामध्ये होती.

