राज्यातील सहकार क्षेत्रातील साखर कारखानदा रीत मांजरा परिवाराचा बिनविरोध निवडीचा नवा पॅटर्न

लातूर दि.३.
राज्यातील सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या लातूर जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, रेणा साखर कारखाना, विलास साखर कारखान्याच्या २०२५- २०३० या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले असून राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या परिवारातील तीनही सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आहे राज्यातील सहकार क्षेत्रात सलग २५ वर्षात बिनविरोध निवडून येणारे मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने पहिले ठरलेले असून राज्याच्या सहकार क्षेत्रात या बिनविरोध निवडीमुळे मांजरा साखर परिवाराचा नवा पॅटर्न निर्माण झाला आहे

बिनविरोध निवड
अन् सभासदांचा परिवारावर विश्वास
राज्यात अनेक जिल्ह्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्याची निवडणुक असो की सर्वसाधारण सभा असो की तिथं पोलिस बंदोबस्त तैनात केलेला असतो इथ लातूर जिल्ह्यातील परीस्थिती वेगळी आहे आपल्या जिल्ह्यात सर्वसाधारण सभा म्हटले की लोक स्वतः सभेला येतात अगदी एखाद्या आपल्या घरचां कार्यक्रम असल्यासारखे येतात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याकडे सभा बैठका पार पडतात वेगळा आनंद घेतात हे आपल नात परिवाराने टिकवले आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी ज्या पद्धतीने मांजरा साखर उद्योग उभे केले तो शेतकरी केंद्रबिंदू मानून कार्य केले अजूनही त्याच पद्धतीने राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकारी साखर कारखानदारी अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून कार्य करीत या भागातील आर्थिक सुबत्ता देण्याचे काम या मांजरा साखर परिवारातील साखर कारखान्यानी केलेले आहे हे सगळ आपण उघड डोळ्याने पाहतोय त्यामुळें या कारखानदारीत राजकीय हस्तक्षेप राजकारण केलं नाही समाजाचे भल कस होईल व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कसे करता येईल याचा जास्त विचार संचालक मंडळ करीत असताना कारखाने चांगले व नफ्यात चालले पाहिजे याकडेही परिवाराचे लक्ष असते त्यामुळें गेल्या २५वर्षात पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत सहकार क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे राज्यात नावलौकिक म्हणुन मांजरा परिवाराची ओळख राहिलेली आहे त्यामुळे राजकीय विरोधक सुधा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत फॉर्म सुधा भरत नाहीत हे विशेष आहे कारण हे साखर उद्योग नुसते कारखाने नाहीत तर शेतकऱ्यांचे मंदिर झालेले आहेत हे सर्व ग्रामीण भागातील उस उत्पादक शेतकऱ्यांना मतदारांना चांगल माहीत आहेत त्यामुळें परिवारातील मांजरा,रेणा, विलास साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणुकीत लोकनेते विलासराव देशमुख सहकार विकास पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत विरोधकांचा तीनही साखर कारखान्यात एकही नामनिर्देशन फॉर्म राहिला नाही हे मांजरा साखर परिवारावर असलेल्या लोकांकडून विश्वासाची कार्याची पावती आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही
लोकांच्या विश्वासाला मांजरा परिवार पात्र
जिल्ह्यात मांजरा साखर परिवाराचे मांजरा, रेणा, विलास, विलास २, मारुती, जागृती ट्वेंटी वन असे तर जिल्ह्याबाहेर परभणी नांदेड,धाराशिव जिल्ह्यात ३ साखर उद्योग आहेत असे एकूण १० साखर कारखाने आहेत सगळीकडे उसाला एकच भाव देणारा हा परिवार आहे या साखर कारखानदारी मुळे जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता मिळत आहे शेतकरी शेतमजूर तरुणांना रोजगार मिळाला आहे त्यामुळें उस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम या परिवाराने केले आहे त्यामुळे लोकांना निवडणूक व्हावी यात रस नाही चांगल करत आहेत उसाला योग्य भाव मिळत आहेत उस उत्पादक शेतकऱ्यांना उसासाठी कोणाच्या मागे लागायची गरज नाही नियमाने उसाचे गाळप होत आहे त्यामुळे उस उत्पादक सभासदांनी पुन्हा संचालक मंडळ बिनविरोध निवड व्हावी याकडेच जास्त लक्ष वेधून घेतलेले दिसत आहे राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बिनविरोध निवडीची परंपरा परिवारातील साखर कारखान्याच्या सभासदांनी राखली आहे
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना नूतन संचालक मंडळ
बिनविरोध
२१ जागेसाठी २१ उमेदवार राहिल्याने लोकनेते विलासराव देशमुख सहकार विकास पॅनलचे सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत निवडून आलेल्या उमेदवारांत
माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित विलासराव देशमुख, मदन भिसे, नवनाथ काळे, अशोक काळे, वसंत उफाडे ,कैलास पाटील, धनराज दाताळ, तात्यासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पवार, कदम भैरू, श्रीशैल्य उटगे, सदाशिव कदम नीलकंठ बचाटे सचिन शिंदे दयानंद बिडवे, निर्मला चामले , छायाबाई कापरे, शंकर बोळंगे, अनिल दरकसे, बाळासाहेब पांढरे यांचा समावेश आहे

