मटका किंग… गुटखा किंग… गांजा किंग… क्लब किंग… वाळू किंग… टॅंकर किंग…
लातूरचं नाव आता ‘किंगडम ऑफ माफिया’ झालंय!
पण या साऱ्यांत गमावला गेला तो – सामान्य लातूरकर!‘
पाणी’ नशिबावर, ‘स्वाभिमान’ गुलामगिरीत!
दोन महिने झाले – नळांमधून पाणी नाही, येतं ते पिवळसर, दुर्गंधीयुक्त!
महापालिका अधिकारी फक्त ‘चार दिवसांत पाणी येईल’ अशा थापा मारतात…
पण सत्य? पाणी आठवड्याने येतं!
लातूरच्या नागरिकांनी नातं तोडलंय आपल्या हक्कांशी – कारण गुलामांना स्वाभिमान नसतो, आणि लातूरकर फक्त सोसत आहेत
!रस्ते की दुकानं? व्यवसा !यासाठी रस्त्यांची लूट!
शहरातील रस्ते वाहतुकीसाठी नसून आता व्यवसायासाठी ‘आरक्षित’ आहेत.
“माझ्या दुकानासमोरची जागा माझी” – ही मनोवृत्ती सर्वदूर फोफावलीये!
रस्त्यावर दुकाने, फुटपाथवर अतिक्रमण… आणि वरतून सामान्य नागरिकाला पार्किंग पावती फाडावी लागते!“
लातूर पॅटर्न” – भाड्याने रस्त्याची विक्री!
राजीव गांधी चौक ते कान्हेरी चौक या रिंग रोडला दोन्ही बाजूंनी 30 फुटांचा स्वतंत्र रस्ता आहे – होता!
आज तिथं रस्ता नाही, फक्त दुकाने आहेत!
हक्काचा सार्वजनिक रस्ता, खासगी मालकीने व्यापून भाड्याने देणं – हा लातूर पॅटर्न… भ्रष्टाचाराचा ब्रँड झाला आहे!
पोलीस प्रशासन झोपेत की गाठ बांधलीय?
अशा प्रकारांची पोलीसांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे.
रस्त्यांवर दुकानं? फुटपाथवर कब्जा? नागरिकांसाठी अपमान, गुन्हेगारांसाठी मोकळं मैदान?
लातूरकरांनो, स्वाभिमान जागा करा!
पाणी, रस्ता, स्वच्छता, वाहतूक – हे तुमचे अधिकार आहेत, उपकार नाहीत!
‘किंग्ज’चा पाडाव करायचा असेल तर आवाज उठवा – आत्ता आणि इथेच!

