
लातूर, दि. २३ एप्रिल २०२४ (प्रतिनिधी) – विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्यक्रमाधिकाऱ्यांची लातूर विभागीय बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीस विविध जिल्ह्यांतील कार्यक्रमाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत प्रमुख मार्गदर्शन करताना सहाय्यक शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय मठपती म्हणाले, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ राष्ट्रीय मूल्यांचं बाळकडू दिलं जात नाही, तर त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.”

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड होते. मंचावर उपप्राचार्य डॉ दिलीप नागरगोजे, विभागीय समन्वयक डॉ. संदीपान जगदाळे, नांदेड जिल्हा समन्वयक प्रा. मारुती हनमंतकर, धाराशिव जिल्हा समन्वयक प्रा. मोहन राठोड, लातूर जिल्हा समन्वयक प्रा. विजय गवळी, तसेच श्री. सुरेश धांदारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
बैठकीत लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे कार्यक्रमाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी रासेयोच्या विविध उपक्रमांबाबत आपले अनुभव शेअर केले.
प्रास्ताविकात डॉ. संदीपान जगदाळे यांनी लातूर विभागाची रासेयोची उज्वल परंपरा पुढे चालू ठेवण्याचा संदेश दिला. प्रा. मारुती हनमंतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. विजय गवळी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. मोहन राठोड यांनी केले.
सत्रांत बैठक यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. विलास कोमटवाड, प्रा. अनिल भुरे, प्रा. निलेश मंत्री, प्रा. विशाल चव्हाण व निर्मला दहिरे यांनी विशेष योगदान दिले.
ही विभागीय बैठक रासेयोच्या आगामी उपक्रमांना दिशा देणारी आणि प्रेरणादायी ठरली.

