जवळपास बत्तीस लाखांचे नुकसान.
जाणवळ
जानवळ तालूका चाकूर येथे मध्यरात्री १२. ३० वाजता अचानक लागलेल्या आगीत चार दुकाने पूर्णतः जळाले असून यात ३१९०००० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा सकाळी गाव महसूल अधिकारी गौतम सोनटक्के यांनी केला आहे.

सविस्तर व्रत्त असे कीं जाणवळ येथील सूर्यकांत धोंडीराम कर्डीले यांच्या मालकीचे पण भाडे तत्वावर दिलेले पाच दुकाने मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत भस्म झाले असून यात चार दुकाने पूर्णतः जळाले असून एक अर्धवट जळाले आहे. दुकान क्र. १) दिनेश ज्ञानोबा पवार यांचे राजमुद्रा बेकारीचे- दोन फ्रिज, फर्निचर व इतर असे ३८०००० रुपयांचे. दुकान क्र. २) रवी नागनाथ शिंदे यांचे श्रेया मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक मधील मोबाईल, टी. व्ही., फ्रिज, फर्निचर असे १५००००० लाख. दुकान क्र. ३) मोरया मल्टी सर्व्हिस यांचे कॅम्पुटर इनव्हेर्टर ब्याटरी व इतर असे १६०००० चे. दुकान क्र. ४) श्यामराव लक्ष्मण राठोड यांचे अजय किराणा दुकानाचे फ्रिज, फर्निचर व इतर माल असे ८००००० रुपयांचे तर गाळेमालक सूर्यकांत धोंडीराम कर्डीले यांच्या गळ्यांचं ३५०००० रुपयांचे असे एकूण ३१९०००० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा गाव महसूल अधिकारी यांनी केला आहे. ग्रामस्थ्यांच्या अथक दोन तासाच्या परिश्रमानंतर आग नियंत्रणात आली. पोलीस २. ३० तर अग्निशमन २. ४५ वा. पोचले.

