
लातूर : उच्चदाब वीजवाहिन्या बदलण्याचे काम शहराच्या उत्तर परिसरात सुरू असल्याने उद्या रविवार दि.२७ एप्रिल रोजी ११ केव्ही मारूती फर्टीलायझर या वीजवाहिनीवरील परिसराचा वीजपुरवठा सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. वीजग्राहकांनी याची दखल घेवून वीजबंद असलेल्या काळात सहकार्य करावे असे आवाहन लातूर उत्तर उपविभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीमती ज्योती कुमठेकर यांनी केले आहे.
एनआयडीसी उपकेंद्रावरून निघणाऱ्या व लातूर उत्तर उपविभागांतर्गत येणाऱ्या ११ केव्ही मारूती फर्टीलायझर वीजवाहिनीवरून वीजपुरवठा होणाऱ्या आनंद नगर, डॉक्टर कॉलनी, टेक्सटाईल झोन, अरोमा हॉटेल, सूळ कॉम्प्लेक्स, पांडुरंग मंगल कार्यालय, श्री नगर, हनुमान मंदिर परिसर तसेच एमआयडीसी परिसराच्या भागातील वीजपुरवठा रविवारी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहील.
वीजग्राहकांनी सदरील वेळेची दखल घेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

