
लातूर, २५ एप्रिल – कश्मीरातील पहलगाम येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावती शहरात मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली जगदंबा मंदिर गोलाई येथून सुरू होऊन भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सांगता झाली. रॅलीमध्ये भगवे झेंडे, घोषणांनी व मशालींच्या प्रकाशात संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

या रॅलीचे नेतृत्व देविदास काळे, नरेंद्र बोरा, मनोज डोंगरे, अॅड. गणेश गोमसाळे, उत्तेकर यांनी केले. बजरंग दल, हिंदू रक्षा दल, भारतीय जनता पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर अनेक संघटनांचे प्रतिनिधी तसेच शेकडो माता-भगिनींनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रॅलीदरम्यान “जय श्रीराम”, “भारत माता की जय”, “पहलगाम अत्याचारांचा निषेध असो” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. काश्मिरी हिंदूंच्या सुरक्षेची मागणी करत केंद्र शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणीही यावेळी उपस्थितांनी केली.
रॅलीचे आयोजन अत्यंत शिस्तबद्धपणे पार पडले. पोलिस बंदोबस्ताचे योग्य नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण रॅलीत शांतता व संयम राखण्यात आला.
या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण देशाचे लक्ष कश्मीरमधील हिंदू बांधवांच्या स्थितीकडे वेधले जावे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.

