
कोपरा धानोरा येथील घटना
अहमदपुर – वालिमाचा कार्यक्रम करून आटपून रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान पाथरी जि.परभणी कडे निघालेला टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने कोपरा धानोरा कार्नर जवळ पुलाच्या कठड्याला टेम्पो धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये १ ठार व ४० जण जखमी झाले आहेत .

धानोरा ( ता. अहमदपुर ) येथील मेहताब शेख यांच्या मुलाचा विवाह गुरुवारी झाला डफवाडी ता. पाथरी येथील वधू कडील ६० ते ६५ मंडळी धानोरा येथे शुक्रवारी टेम्पोतून एम .एच .२० ई. जी.७७०१ पाथरीकडे रात्री निघाले रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान कीनगांव जवळील धानोरा कॉर्नरला पुलाच्या कठडयाला हा टेम्पो धडकला त्यामूळे उलटला यात १२ वर्षाचा मुलगा अलमाश शेख हा जाग्यावरच ठार झाला . जखमींना अंबाजोगाई येथील रुग्णालयात ३३जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींना अहमदपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

