
आज दिनांक २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्री आदित्य शिंदे व श्री जोतिराम क्षिरसागर यांनी मागील पाच दिवसांपासून चालू असलेले अमरण उपोषण स्थगित केले. उपोषण स्थळी मा. आ. अभिमन्यूजी पवार, भाजप जिल्हाध्यक्ष श्री देवीदासजी काळे, श्री नरेंद्र बोरा, SDO नरे मॅडम, मनवा उपायुक्त श्री देवीदास जाधव, DYSP श्री रणजित सावंत साहेब तसेच असंख्य गोरक्षक व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशासनाकडून अनधिकृत बिफ शॉप व अवैध कत्लखाने कायमचे बंद करण्याचे स्पष्ट आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. या निर्णयामुळे गोरक्षक व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

