
एकुर्गा (प्रतिनिधी) | युतीचक्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकुर्गा (ता. उदगीर) येथे दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 9 ते 11 या वेळेत अंधश्रद्धा निर्मूलन उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावकऱ्यांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन जाधव साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष माधव बावगे, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे, जिल्हा प्रधानसचिव प्रा. डॉ. बळीराम भुक्तरे, उदगीर शाखेचे उपाध्यक्ष माशाळकर सर, कार्याध्यक्ष रोडगे सर, तसेच लातूर शहर शाखेचे कार्याध्यक्ष डॉ. गणेश गोमारे उपस्थित होते.
शिबिरात अंधश्रद्धा, अंधविश्वास व त्यावरील उपाय या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याचे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे संयोजन रवीकुमार गायकवाड व जयंती उत्सव समितीने केले होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजन व्यवस्था होती. कार्यक्रम रात्री उशिरा यशस्वीरित्या संपन्न झाला.

