मनपाच्या अतिक्रमण विभागाची सहा चाकी गाडी बिनकागदपत्रे रस्त्यावर धुमाकूळ घालत होती. कायद्यानं बंधनकारक असलेले दस्तऐवज नसतानाही वापर सुरूच! वायुवेग पथकानं केली थेट जप्ती! आता जबाबदारी कोणाची?”


लातूर, प्रतिनिधी:
लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची सहा चाकी मालवाहतूक टेम्पो ही बिनकागदपत्रे असूनही, शहरातील फेरीवाल्यांच्या हातगाड्या उठवण्यासाठी वापरली जात होती. यासंदर्भात ‘मोटार वाहन अधिनियम, 1988’ (Motor Vehicles Act, 1988) अंतर्गत वाहनासोबत असणे आवश्यक असलेले कागदपत्रे – आर.सी. (नोंदणी प्रमाणपत्र), विमा, फिटनेस प्रमाणपत्र, वाहन परवाना (Permit) – हे पूर्णतः गैरहजर असल्याचे उघड झाले.
याशिवाय, कलम 190(2) नुसार वाहन जर धोकादायक अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी चालवले जात असेल, तर चालक व संबंधित यंत्रणेला दंड व कारवाईस सामोरे जावे लागते.
या गाडीत हातगाड्या एकावर एक रचून, काही वेळा एकमेकांना दोरांनी बांधून भर रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने ओढण्यात येत होत्या. यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता.
याबाबत ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या फेरीवाला संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पडवळ आणि समिती सदस्य त्र्यंबक स्वामी, बंडूसिंग भाट, रविकांत सूर्यवंशी, आनंद ढोणे, साहेरा पठाण यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत, आज सायंकाळी सात वाजता गंजगोलाई परिसरात वायुवेग पथकाचे प्रमुख आडे साहेब आणि त्यांच्या टीमने सदर बिनकागदी गाडीवर थेट कारवाई करत ती जप्त केली.
या प्रकारामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, नियम सर्वांसाठी सारखे असले तरी अतिक्रमण विभाग मात्र स्वतःच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
आता या प्रकरणाची चौकशी सुरु असून, संबंधित अधिकारी व गाडीचालक यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
# लातूर #अतिक्रमण #वायुवेगपथक #बिनकागदीगाडी #शिवसेना #फेरीवाले #मनपा #RTOकारवाई #BreakingNews #MarathiNews

