
कार्यकारी अभियंता पोवार व सामसे यांचा संचालक भादिकर यांनी केला सत्कार
लातूर, दि. ८ मे : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बद्दल निलंगा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पोवार आणि लातूर विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सामसे यांचा सत्कार महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांच्या हस्ते करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालय येथे काल (दि.७मे) पार पडलेल्या आढावा बैठकीत निलंगा व लातूर विभागाचा गौरव करण्यात आला. मार्च,२०२४ ची थकबाकी व मार्च, २०२५ अखेर मागणीच्या १०० टक्के वसुलीचा निल्रगा पॅटर्न कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी कायम ठेवला आहे. निलंगा विभागांतर्गत येणाऱ्या ७६ गावांनी वीजबिलांची थकबाकी शुन्य करीत एक नवा पायंडा निर्माण केला आहे. औसा, किल्लारी, कासार शिरसी, निलंगा, उपविभाग त्याचबरोबर शिरूर अनंतपाळ उपविभागातील ७६ गावांची थकबाकी शून्य केली आहे. तर वीजचोरीला आळा घालत ५३ गावे आकडेमुक्त् करण्यात निलंगा विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांना यश मिळाले आहे. वर्षभराच्या वीजबील वसुली कार्यक्षमतेतही निलंगा विभाग छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयात अव्वल ठरला आहे. तसेच निलंगा विभागा पाठोपाठ लातूर विभागानेही कार्यकारी अभियंता गणेश सामसे यांच्या पुढाकारातून २३ गावांची थकबाकी शून्य केली आहे. तर वर्षभराच्या वीजबील वसुली कार्यक्षमतेतही छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जनमित्र व शाखा अभियंत्यांनी पथदर्शक पाऊल उचलत देय तारखेच्या आत मार्च महिन्याचे वीजबील व थकबाकी शंभर टक्के वसूल करण्यात यश मिळवले आहे.
या यशा बद्दल कार्यकारी अभियंता संजय पोवार आणि गणेश सामसे यांनी सर्व श्रेय मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, तत्कालीन अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांच्या नियोजनाचे असून यशाचे खरे मानकरी सर्व तंत्रज्ञ, जनमित्र, लेखाधिकारी, मानव संसाधन विभागाचे कर्मचारी तसेच सर्व अभियंते असल्याचे सांगितले. वीजग्राहकांशी सुसंवाद ठेवला आणि ग्राहकाभिमुख सेवा प्रदान केली तर काहीही अशक्य नाही असे विचार सत्कार प्रसंगी बोलताना संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांनी कार्यकारी अभियंत्याचे अभिनंदन करत व्यक्त केले.
फोटो ओळ : उत्कृष्ट कामगिरी बद्दल निलंगा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पोवार आणि लातूर विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सामसे यांचा सत्कार महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अभियंता श्री अरविंद बुलबुले तसेच कार्यकारी अभियंता प्रशासन श्री बी.जी शेंडगे

