
लातूर (रेणापूर) : रेणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या दक्षतेमुळे गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात आला असून, त्यामधील एकूण ३१ बैल व कंटेनरसह एकूण १८.५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
घटनास्थळ: ही कारवाई 13 मे 2025 रोजी पहाटे 1.45 वाजण्याच्या सुमारास सेवादासनगर तांडा, रेणापूर ते आष्टामोड रोडवर करण्यात आली.

फिर्याद व तपशील:
पोलीस नाईट पेट्रोलिंग करत असताना पोना/655 नितीन अशोकराव भताने व चालक पोह/927 बनसोडे यांना डायल 112 वरून आदर्श जैन यांनी कंटेनरबद्दल माहिती दिली. त्यानंतर तत्काळ हालचाल करत त्यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित कंटेनर (क्र. KA-54-7728) ताब्यात घेतला.

कंटेनरमध्ये काय आढळले?
- एकूण ३१ गोवंश बैल,
- बैल दाटीवाटीने, कोंबून, दोरी व कुर्त्याने बांधलेले असल्याचे निदर्शनास आले.
- बैलांची एकूण अंदाजे किंमत 8.50 लाख रुपये,
- कंटेनर किंमत 10 लाख रुपये,
- एकूण मुद्देमाल 18.50 लाख रुपये.
आरोपी व माहिती:
वाहन चालक नाजीम खान अब्दुल अजीज (वय 36, रा. शांतीनगर, म्हैसूर, कर्नाटक) याने सांगितले की बैल हे कृष्णा रामभाऊ शिंदे व सय्यद मिस्कीन सय्यद साबेर (दोघे रा. नेकनुर, ता. जि. बीड) यांचे असून ते नेकनुर बाजारातून नळेगाव (ता. चाकूर) बाजारासाठी नेले जात होते. बैलांची कागदपत्रे सादर करण्यात आली, मात्र वाहतुकीची पद्धत ही निर्दयी व बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांची कार्यवाही:
पोलीस अंमलदार 1266 मामडगे यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कायदेशीर कारवाई:
आरोपींवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(घ) व मोटार वाहन कायदा कलम 66(1)/192 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
पोलीस प्रशासनाची तत्परता आणि दक्षतेमुळे गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीला मोठा आळा बसला असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

