
लातूर, दि.१७ मे: महापारेषण कंपनीच्या १३२/११ केव्ही एमआयडीसी अतिउच्च दाब उपकेंद्रातील देखभाल दुरूस्तीकरिता लातूर शहर शाखा क्रमांक ०७ अंतर्गत येणाऱ्या ११ केव्ही बांधकाम भवन फिडर तसेच शाखा क्रमांक ०९ अंतर्गत येणाऱ्या ११ केव्ही दयानंद फिडर व कीर्ती ऑईल फिडरवरील परिसराचा वीज पुरवठा रविवार ( दि. १८ मे ) सकाळी ०९ ते दुपारी ०२ या दरम्यान बंद राहील.
शहर शाखा क्रमांक ७ अंतर्गत येणाऱ्या माणिकराव जाधव मंगल कार्यालय, पांडुरंग नगर, संस्कृती नगर, कन्हैया नगर, गोपाळ नगर, गोविंदा बार, रविशंकर शाळा, उत्तरादी मठ, राजनंदा शाळा, वासणगाव रोड, रामगिरी नगर, दालचिनी हॉटेल, परिवार सोसायटी, फेरे डीपी, कृषी नगर, अयोध्या कॉलनी, तेरणा कॉलनी, सह्याद्री हॉस्पिटल, शाहूपुरी कॉलनी, यमुना सोसायटी, कोकाटे नगर, गुणगुणे नगर, आरजे कॉम्प्लेक्स, ड्रायव्हर कॉलनी, इंजिनिअरिंग कॉलनी, पत्तेवार कॉलनी, आदर्श कॉलनी, गणेश नगर, देशपांडे कॉलनी, जुना औसा रोड, लक्ष्मी कॉलनी, महसूल कॉलनी, विठ्ठल नगर,, इत्यादी भागातील वीज पुरवठा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्संत बंद राहील.
शहर शाखा क्रमांक ०९ अंतर्गत येणाऱ्या ११ केव्ही दयानंद फिडरवरील प्रकाश नगर (पुर्व व पश्चिम बाजू), कपिल नगर, खाडगाव रोड वरील पुर्व व पश्चिम बाजू, पारिजात सोसायटी, तुळजाई हॉस्पिटल जवळील एरिया, एमएसईबी कॉलनी, खाडगाव रोड स्मशान भूमी पाठीमागील बाजू, जिजामाता नगर, सरस्वती शाळेजवळील एरिया, राम रहीम नगर, सदाशिवनगर, इंदिरा गांधी शाळेजवळील एरिया, साठे वीट भट्टी जवळील भाग, प्रकाश नगर रोडवरील पूर्व बाजू व पश्चिम बाजू पुर्ण, ज्ञानदेव मंगल कार्यालय, भक्ती शक्ती मंगल कार्यालय, भगवान शाळा, पार्क स्ट्रीट, गिरवलकर नगर, अमलेश्वर नगर, पंचवटी नगर, चौधरी नगर, पठाण नगर, विकास नगर, गित्ते मॅडम डीपी, न्यू भाग्य नगर, वाल्मिकी नगर, ओल्ड रेल्वे लाईन वरील उत्तर व दक्षिण बाजू, नरहरे क्लासेस जवळील भाग, जी एस पाटील मळा, दयानंद कॉलेज, खाडगांव रोड ची पश्चिम बाजू, इत्यादी भागातील वीज पुरवठा सकाळी ०९ ते दुपारी ०२ या दरम्यान बंद राहील.
११ केव्ही कीर्ती ऑईल फिडर वरील कीर्ती ऑईलमील, बाई काकाजी, इंदिरा सुत गिरणी, अरोमा हॉटेल, टेक्सटाइल झोन, कल्याणी इंडस्ट्री, डॉ. कॉलनी परिसराचा तसेच ११ केव्ही मारुती फेत्रो केमिकल फिडरवरील मारुती फेत्रो केमिकलचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी २ या काळात बंद राहील.
वीजग्राहकांनी सदरील वेळेची दखल घेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. खंडीत वीजपुरवठ्याबाबत लातूर शहर सनियंत्रण कक्षाच्या ७८७५७६२०२१ या मोबाईल क्रमांकावर २४ तास तसेच १९१२, १८००२१२३४३५ व १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

