
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा विस्तारित राज्य बैठकीत करण्यात आली असून अध्यक्षपदी माधव बावगे यांची तर राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. राज्यभरातून या बैठकीला ४६० कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे.

लोणखेडा (ता. शहादा) येथिल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विस्तारित राज्य कार्यकारणी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी निवड सहमती समितीचे सदस्य माधव बावगे, सुशिला मुंडे, संजय शेंडे यांनी २०२५ ते २०२८ पर्यंतच्या त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणीची निवड जाहिर केली. ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे (लातूर) यांची अध्यक्षपदी व संजय बनसोडे (इस्लामपूर जि. सांगली) राज्य कार्याध्यक्ष पदावर निवड जाहिर करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष पदांवर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, नाशिक डॉ. प्रदिप पाटकर पनवेल, डॉ. अशोक बेलखोले किनवट, शामराव पाटील इस्लामपूर, संतोष आंबेकर, बुलढाणा, संजय शेंडे, नागपूर रश्मी बोरीकर, संभाजीनगर यांची निवड करण्यात आली आहे तर राज्य प्रधान सचिव म्हणून गजेंद्र सुरकार (वर्धा), डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक), विनायक सावळे (शहादा जि. नंदुरबार), रुक्साना मुल्ला (लातूर), विजय परब (मुंबई) यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकारी समितीत सरचिटणीस म्हणून आरती नाईक (पनवेल), सुरेश बोरसे (शिरपूर जि. धुळे), कृष्णात कोरे (कोल्हापूर), सुधाकर काशीद (सोलापूर), विलास निंबोरकर (गडचिरोली), शहाजी भोसले (छ.संभाजीनगर), उत्तरेश्वर बिराजदार (लातूर) यांचा समावेश आहे.
उर्वरित राज्य कार्यकारीणीत विविध विभागांच्या कार्यवाह व सहकार्यवाह यांची पुढीलप्रमाणे निवड झाली : बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह अॅड. रंजना गवांदे, सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, विविध उपक्रम विभाग : कार्यवाह अनिल दरेकर, वैज्ञानिक शिक्षण प्रकल्प कार्यवाह प्रा. दिगंबर कट्यारे, सहकार्यवाह प्रकाश कांबळे, पी.एम. जाधव, रविंद्र पाटील, महिला सहभाग कार्यवाह गायत्री आडे, सहकार्यवाह रुपेश शोभा, युवा सहभाग प्रियंका खेडेकर, सहकार्यवाह हरी आवळे, जोडीदाराची विवेकी निवड कार्यवाह रेश्मा खाडे, सहकार्यवाह कविता मते, जातपंचायत मूठमाती अभियान कार्यवाह कृष्णा चांदगुडे, मिश्र विवाह, सत्यशोधकी विवाह रणजित आचार्य, प्रशिक्षण व्यवस्थापन : कार्यवाह किर्तीवर्धन तायडे, सहकार्यवाह डॉ. माधुरी झाडे, वि.जा. प्रकाशन, वितरण कार्यवाह प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे, अंनिप संपादक मंडळात मुख्य संपादक डॉ. नितीन शिंदे, कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड, सदस्य डॉ. बाळू दुगडूमवार, प्रल्हाद मिस्त्री, श्यामसुंदर मिरजकर, राजेंद्र फेगडे, हंसराज महाले, अजय भालकर, मानसिक आरोग्य व्यवस्थापन : कार्यवाह डॉ. अनिल डोगरे, डॉ. प्रदिप जोशी, सहकार्यवाह अत्ल बडवे, विश्वजित चौधरी, विज्ञान बोध वाहिनी : कार्यवाह भास्कर सदाकळे, सहकार्यवाह बाबा हलकुडे, सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह अनिल शोभना वसंत, सहकार्यवाह सचिन गोवळकर, सोशल मिडिया: कार्यवाह मनोज बोरसे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समन्वय :
कार्यवाह प्रा.डॉ. सुदेश घोडेराव, निधी व्यवस्थापन कार्यवाह प्रा.परेश शाह, सहकार्यवाह सुधीर निंबाळकर, कायदेविषयक व्यवस्थापन कार्यवाह अॅड. मनिषा महाजन, सहकार्यबाह अॅड. तृप्ती पाटील, अॅड. गोविंद पाटील, व्यसनविरोधी प्रबोधन आणि संघर्ष कार्यवाह सारिका डेहनकर, सहकार्यवाह सुधाकर तट, संविधान जागर विभाग : कार्यवाह अॅड. परिक्रमा खोत, सर्वेक्षण आणि संशोधन विभाग कार्यवाह प्रा. डॉ. बालाजी कोंपलवार, सहकार्यवाह प्रा. डॉ. हरीश पेटकर, समविचारी संपर्क आणि समन्वय नंदकिशोर तळाशिलकर, दस्तऐवज संकलन कार्यवाह अशोक निकम, विवेक वाहिनी कार्यवाह प्राचार्या डॉ. सविता शेटे, सहकार्यवाह प्राचार्य डॉ. विठ्ठलराव घुले, प्रा.डॉ. संतोष जेठीथोर यांची निवड करण्यात आली आहे.

