उर्वी प्रशांत हुडे हीने पटकावला प्रथम क्रमांक

लातूर, दि. ०३ जून : महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त बालकांनाही वीज सुरक्षेचे धडे रंगवता या उद्देशाने आयोजीत चित्रकला स्पर्धेत महावितरण मधील अधिकारी, कर्मचारी यांच्या पाल्यांनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना प्रभारी मुख्य अभियंता प्रशांत दाणी यांच्या हस्ते बक्षीसांचे वाटप करण्यात आले.

राज्यभरात १ ते ६ जून दरम्यान वीज सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी (०३ जून) लातूर विभागामध्ये प्रशिक्षण केंद्र येथे १५ मुलांनी तर निलंगा विभागांतर्गत निलंगा येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धेत ४० पाल्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून वीज सुरक्षे बाबत विविध आशयाची चित्रे रेखाटली.लातूर येथील स्पर्धेत प्रथम क्रमांक उर्वी प्रशांत हुडे हीने पटकावला तर अदीती गोकूळ कांबळे हीने दुसरा क्रमांक पटकावला तर तिसरा क्रमांक अलिजा फातिमा तय्यब मुल्ला व श्रेयश विकास बाळापूरे या दोघांना विभागून देण्यात आला. लातूर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश पाटील, उपव्यवस्थापक अजीत जैन,मंजूषा पाठक, मारुती कांबळे यांनी परिश्रम घेतले तर निलंगा विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश देशमूख, उपकार्यकारी अभियंता शिवशंकर सावळे, उपव्यवस्थापक संजय पाटील, कनिष्ठ अभियंता शरद खाडे यांनी परिश्रम घेतले.
सुरक्षा सप्ताहात ४ जून रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्य व कुटूंबियांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वीज सुरक्षा विषयी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जुनला वसुंधरा दिनी सर्वच सात विभागीय स्तरावर वीज सुरक्षा व बचत विषयी रॅली काढण्यात येणार असून वृषारोपन ही केले जाणार आहे. तर ६ जून रोजी सकाळी परिमंडलातील सर्व शाखा कार्यालयातील जनमित्र वीज सुरक्षेबाबत प्रतिज्ञा घेणार आहेत. याच दिवशी महावितरणचा २० वा वर्धापन दिन सर्व कार्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

