लातूर, दि. २५ जून : जूने पॉवर हाऊस परिसरात असलेल्या महावितरणच्या मंडळ कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले असून एमआयडीसी मधील किर्ती ऑईलमील समोर असलेल्या परिमंडळ कार्यालय परिसरात मंडळ कार्यालय सुरू करण्यात आले आहे. वीजग्राहक व संबंधीत आस्थापनांनी याची दखल घेवून नवीन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी यांनी केले आहे.
ऑक्टोबर महिण्यात दि.१८ रोजी मध्यरात्री परिमंडळ कार्यालयास आग लागून मोठे नूकसान झाले होते. या आगीमध्ये मंडळ कार्यालयासही झळ बसून अधीक्षक अभियंता यांच्या केबीनसह बरेच फर्निचर जळाले होते.परिमंडळ कार्यालय यापुर्वीच स्थलांतरीत करण्यात आले होते. आता मंडळ कार्यालयाचेही फर्निचरचे काम पुर्णत्वास आल्याने नुकतेच मंडळ कार्यालयाचे संपूर्ण कामकाज एमआयडीसी परिसरातील किर्ती ऑईलमील समोर असलेल्या महावितरणच्या जागेत सुरू करण्यात आले आहे. वीजग्राहकांसह महावितरणशी संबंधीत कामकाजासाठी नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी.

