
निलंगा दि.२७ (सा.वा.)- येथे महादेव मंदिर शेजारी श्री स्वामी समर्थ मठातील श्री राम मंदिर आहे. या मंदिराची भिंत पावसामुळे पडली आहे. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
हा समर्थ सांप्रदायाचा साधारणपणे १६५० च्या दरम्यान स्थापन झालेला मठ आहे.स्वतः समर्थ रामदास स्वामी हे निलंगा येथे आले होते व त्यांनी बत्तीस शिराळा येथील त्यांचे शिष्य आनंद स्वामी यांची या मठाचे मठपती म्हणून नेमणूक केली होती.
कालौघात या मंदिरात जुन्या बांधकामाची बरेचदा दुरुस्ती झालेली असणार.अता सतत चालू असणाऱ्या मुसळधार व झडीच्या पावसामुळे राममंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील पाठीमागची म्हणजेच पश्चिमेची भींतीचा भाग कोसळला आहे.

