
सप्टेंबर महिन्याच्या अपेक्षित पावसापेक्षा दुप्पटीने पाऊस झाला
लातूर दि. 27
लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी 75.3 मिमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत (162.9 मिमी सरासरी) प्रत्यक्षात 336.0 मिमी पाऊस झाला आहे. दि. 1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित पर्जन्यमानाच्या (687.9 मिमी) तुलनेत 894.5 मिमी म्हणजेच 130.0% इतका पाऊस झालेला आहे. लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) 706.00 मिमी च्या तुलनेत आजतागायत 894.5 मिमी म्हणजेच 126.7% इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

मौजे चवण हिप्परगा ता. देवणी येथे घरावरती जुना बुरुज ढासळला आहे. कोणतीही जीवित हानी नाही. एक व्यक्ती किरकोळ जखमी आहे त्यांना दवाखान्यात पाठवले आहे.
मौजे वाघोली ता. औसा येथील बालाजी प्रल्हाद कात्रे यांची म्हैस काल रात्री झालेल्या पावसानत वीज पडून मयत झाली आहे. गणेश रावसाहेब पाटील राहणार चोबळी यांचा बैल शेतातून उपचारासाठी गावात आणत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चाकूर नगरपंचायतीच्यावतीने चाकूर शहरातील ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे, अशा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करून त्यांच्यासाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 20 कुटुंबे चाकूर शहरात स्थलांतर करावे लागले

अहमदपूर तालुका – चीलखा बॅरेजवर
जलसंपदा विभागाचे 3 मजूर अडकले होते. अहमदपूर व पोलीस हेडक्वार्टर, लातूर येथील शोध-बचाव पथकाच्या मदतीने सर्व तिन्ही मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली. मौजे निवळी येथे एक व्यक्ती शेतातून घराकडे येत असताना पुराच्या पाण्यात अडकला.
स्थानिक होमगार्ड, आपदा मित्र व पोलीस यांच्या मदतीने सुखरूप रेस्क्यू करण्यात आले. मौजे हाळी हंडरगुळी
येथे पुराच्या पाण्यात एक महिला अडकली होती. उदगीर शोध व बचाव पथकाच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली.

जिल्ह्यातील प्रमुख 56 मार्गावरील वाहतूक ठप्प झाली
1)माकणी येथील पुलावरून पाणी जात आहे त्यामुळे माकणी चोबळी रस्ता बंद झाला आहे, पर्यायी रस्ता उमरगा य- चापोली मार्गे आहे.
२)थोडगा येथील पुलावरून पाणी जात आहे त्यामुळे थोडगा- मोघा रस्ता बंद झाला आहे, पर्यायी रस्ता टेंभुर्णी-हसरणी- धानोरा खु. मार्गे आहे
3. हागदळ पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद आहे.
4. उदगीर तालुक्यातील नेत्रगाव रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे
5. निलंगा-कासार शिरशी रोड वरून पाणी वाहत आहे.
6. उदगीर ते देगलूर रस्ता बंद
7. तावरजा नदीला पूर आल्याने धानोरा येथील पुलावरील वाहतूक बंद आहे
8. शिरसी-धानोरा तावरजा नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे.
9. घनसरगाव- रेणापुर पूल पाण्याखाली गेला आहे ता. रेणापुर
10. मौ शेळगाव येथे तिरु नदी वरील पुलावरून पाणी वाहत आहे
11. उजळंब ते रोहिना जाणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे रस्ता बंद आहे. तसेच रोहिना गाव ते अंबिका देवी मंदिर तालुका चाकुर जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे सध्या वाहतूक बंद आहे.

12. रेणापूर- कामखेडा (काळेवाडी) रस्त्यावरून पाणी वाहत आहे
13. आशिव – आशिव तांडा पुलावरून पाणी वाहत आहे
14. कव्हा -जमालपूर रस्ता बंद आहे. तावरजा नदीवरील पुलावरून पाणी जात असल्यामुळे रस्ता बंद आहे.
15. औसा तालुका मौजे जवळगा- पोमादेवी -जवळगा ते संक्राळ जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे
16. धानोरा- गोंद्री रस्ता ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्या कारणाने रस्ता बंद करण्यात आला आहे.
17. खरोळा फाटा ते पानगाव जाणारा मेन रस्ता बंद झाला आहे
18. माकणी येथील पुलावरून पाणी जात आहे त्यामुळे माकणी- चोबळी रस्ता बंद झाला आहे, पर्यायी रस्ता उमरगा य चापोली मार्गे आहे.
19. रेणापूर -काळेवाडी रस्ता बंद झाला आहे
20. सावरगावथोट च्या दोन्ही पुलावरून पाणी वाहत आहे पर्यायी मार्ग शेलदरा मार्ग आहे.
21. वायगाव पाटी ते गादेवाडी जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे गावाला पर्याय रस्ता नसल्याने संपर्क तुटला आहे
22. वळसंगी पुलावरून पाणी वाहत आहे
23. शिरूर आंबेगाव रस्ता बंद आहे पुलावर पाणी आलेलं आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध आहे
24. काळेगावच्या पुलावरून पाणी जात आहे.
25. अहमदपूर काळेगाव ते पुढे खंडाळी जाणारा रस्ता बंद पर्यायी रस्ता नाही.
26. वळसंगी हडोळती रस्ता बंद आहे, थोड्या वेळ साठी डाव्या बाजूचा पूल खचला आहे.
27. आनंदवाडी गावात जाण्याचे दोन्ही रस्ते बंद झाले आहेत.
28. हाळी ते खरबवाडी जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहत आहे.
29. किनी कदू ला जाण्याचे दोन मार्ग आहेत एक सावरगाव थोट हुन आणि एक मोघा. सावरगाव च्या पुलाहून पाणी वाहत आहे व अहमदपूर मोघा रस्ता बंद आहे त्या मुळे किनी कदू संपर्क तुटला आहे आणि तीर्थलाही पर्यायी रस्ता थोडग्याहून आहे. परंतु थोडग्याच्या पुलाहून पाणी वाहत आहे.

30. कोळवाडी ते किनगाव रस्त्यावरून पाणी वाहत आहे. ह्या रस्त्यांनी वाहतूक बंद आहे. पण पर्यायी रस्ता हिंगणगाव येथून सुरु आहे.
31. सिदंगी खु येथील पुलावरून पाणी जात आहे. गावाचा संपर्कासाठी पर्यायी मार्ग बंद आहे.
32. हगदळ ता अहमदपूर जी लातूर पुलावरून पाणी जात आहे हगदळ, वरवंटी, वरवंटी तांडा, रुई दक्षिण, जोतिबा तांडा, आंडगा, शिंदगी, गौडगाव आशा अनेक गावचा संपर्क तुटला आहे
33. सलगरा गावाच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा शिरूर कडे येणारा मार्ग बंद झाल्यामुळे संपर्क तुटला आहे.
34. एरंडी सेलू रोड वरील पुलावरून पाणी वाहत आहे
35. उमरगा कोर्ट ते नांदुरा रस्ता बंद आहे पुलावरून पाणी जात आहे
36. हासरणी ते जांब व उन्नी गावाला जाणारा रस्ता बंद झाला आहे.
37. देवर्जन मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग चालू असून देव नदीला पूर आला आहे. त्यामुळे देवर्जन गावाजवळील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळे हा मार्ग व पंढरपूर तळेगाव मार्ग बंद झाला आहे.
38. मुसळेवाडी ते पानगाव रस्ता बंद झाला आहे.
39. सेलू ते जवळगा पुला खालून पाणी जात आहे. रेणा नदीच्या पाणी वाढत असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या
40. याकतपूर ते कनेरी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने बस वाहतूक सदर मार्ग बंद करण्यात आलेली आहे
41. वासनगाव येथे पुलावर पाणी आले आहे.
42. किनगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद आहे.
43. कलकोटी ते सांडोळ मध्ये पुलावरून पाणी जात आहे
44. वडगाव पुलावर पाणी आल्याने वडगाव चाकुर मार्ग बंद आहे
45. देवर्जन येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने देवर्जन लातूर नियत बंद आहे.
46. दैठणा पुलावर पाणी आल्याने मुक्काम पांढरवाडी येरोळ मार्गे वळवण्यात आले आहे.
47. गौंडगाव ते अहमदपूर या मार्गावर शिंदगी खुर्द या गावी पुलावरून पाणी वाहत असल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेले आहे.
48. लिंबाळा येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे निलंगा कासारशिरसी उमरगा रोड वरील वाहतूक बंद झाली आहे
49. अहमदपूर- कुरुळा रोड वरिल थोडगा पूलावरून पाणी वाहत आहे. त्या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आलेली आहे.
50. रेणापूर- कामखेडा (काळेवाडी) रस्त्यावरून पाणी वाहत आहे
51. किल्लारी – मदनासुरी रोड वरून पाणी वाहत आहे.
55. मोटेगाव ते वांगदरी पुलावरून पाणी वाहत आहे
56. कोळवाडी हुन किनगावास येणारा गावातील रस्त्यावर असणाऱ्या पुलावरून पाणी जात आहे कोळवाडी हुन हिंगणगांव मार्गे पर्यायी मार्ग रस्ता चालू आहे
दि. 27.09.2025 मुसळधार पावसाची शक्यता आहे. दि. 28.09.2025 हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दि. 29.09.2025 हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, दि. 30.09.2025 हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दि. 01.10.2025 हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

