
लातूर, दि. २ ऑक्टोबर २०२५
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त लातूरातील वैशाली सार्वजनिक बुद्ध विहार, बौद्ध नगर येथे मंगलमय वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला दूरसंचार विभागाचे जिल्हा प्रबंधक इंजि. अनिल बनसोडे, व्हीएस पॅंथर संघटनेचे अध्यक्ष विनोद खटके, तसेच माजी नगरसेवक सचिन मस्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सुरुवातीला जिल्हा प्रबंधक अनिल बनसोडे यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी बुद्धवंदना, धम्मध्वज गाथा तसेच बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा उत्साहात घेतल्या.
समाजक्रांतीचे स्मरण
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा प्रबंधक अनिल बनसोडे म्हणाले,
“पूर्वाश्रमीच्या महार समाजाचा जो आज बौद्ध समाज म्हणून उन्नतीकडे प्रवास झाला, तो केवळ बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे शक्य झाला. वाईट चालीरीतींना ठोकर मारून बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनी समाजाला नव्या आत्मभानाची दिशा दिली. शिक्षणासाठी गरिबी अडथळा नसते; गरज असते ती केवळ जिद्दीची. त्यामुळे आजची तरुण पिढी शिक्षणाची जिद्द मनात ठेवून धम्माच्या मार्गावर चालावी, व्यसनापासून दूर राहावे.”
याच वेळी त्यांनी वैशाली बुद्ध विहारात उभारल्या जात असलेल्या ग्रंथालयासाठी शंभर ग्रंथ देण्याची घोषणा केली.
शुभेच्छा व मनोगत
प्रमुख पाहुणे विनोद खटके व सचिन मस्के यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत सूर्यभान लातूरकर, दामू कोरडे, अशोक सातपुते, जगन्नाथ सुरवसे, महादू गायकवाड, सवाई दादा, शुभम भुताळे, कुणाल कांबळे, लताबाई चिकटे, अनुराधा कांबळे, छाया कांबळे, मीना सुरवसे यांनी केले.
सूत्रसंचालन केशव कांबळे यांनी प्रभावीपणे केले. अखेरीस धम्मपालन गाथा व आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे महत्व
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारून धम्मक्रांतीची ऐतिहासिक ज्योत पेटवली. या घटने

