
लातूर (प्रतिनिधी) – राज्यातील बालकलावंतांच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणा-या बालरंगभूमी परिषदेच्या लातूर शाखेतर्फे जल्लोष लोककलेचा या महोत्सवाचे आयोजन दि. 15 व 16 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राची कला व परंपरा जपताना बालमनावर संस्कार करण्याच्या अनुषंगाने बालकांसाठी लोककला महोत्सवाचे आयोजन बालरंगभूमी परिषदेकडून करण्यात येत असते. लोककलांचा प्रगल्भ वसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी व केवळ मनोरंजनात्मक स्वरुप न राहता बालकलांची महती बालकांपर्यंत पोहचन गायन, वादन, नृत्य क्षेत्रात त्यांनी कौशल्य प्राप्त करावे, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात समूह लोकनृत्य व समूह लोकगीत गायनासोबतच एकल लोकनृत्य, लोकगीत गायन व लोकवाद्य वादनाचे स्पर्धात्मक आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होणा-या सर्व बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासोबतच समूह लोकनृत्य व समूह लोकगीत करिता सर्वोत्कृष्ट रु.४०००, सन्मानिचन्ह व प्रमाणपत्र, उत्कृष्ट रु.३०००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तम रु.२००० सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, २ प्रशंसनीय रु.१०००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, एकल लोकगीत गायन, लोकनृत्य, लोकवाद्यवादन याकरिता सर्वोत्कृष्ट रु.२०००, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, उत्कृष्ट रु.१५००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तम रु.१००० सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, २ प्रशंसनीय रु.५००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
जास्तीतजास्त बालकलावंतांनी या महोत्सवात सहभागी होऊन लोककलेचा जल्लोष करावा, अधिक माहितीसाठी रणजित आचार्य 8446865908, मयूर राजापूरे रंगभूमी फॅन्सी ड्रेसेस यशोदा टॉकीज जवळ 9970602990, नवलाजी जाधव निश्चय संस्कृत क्लासेस ट्युशन एरिया लातूर 7276662627, रवी अघाव 7020342672, रविकिरण सावंत 7020362185 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद लातूर शाखेतर्फे करण्यात आले आहे.

