होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स लावताना
स्थानिक प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक
· सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण्यास निर्बंध
लातूर, दि. १४ (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा व रेणापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्याच दिवशीपासून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ही निवडणूक संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.
त्यानुसार होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच त्या निवडणुकीवर प्रभाव पडणाऱ्या लगतच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूक कालावधीत होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, जाहिरात लावताना स्थानिक प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक राहणार आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर इमारती, मालमत्ता पूर्ववत करून घेणे, जाहिराती तत्काळ काढून घेणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रात शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपता करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. ३ डिसेंबर २०२५ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील.
*****
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीत
नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध
लातूर, दि. १४ (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा व रेणापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्याच दिवशीपासून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ही निवडणूक संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी या निवडणूक काळात नमुना मतपत्रिका छपाईबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे व आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे या बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
*****
आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या
परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई
लातूर, दि. 14 : राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा व रेणापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव आणि आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच सर्व उपविभागीय कार्यालये, तालुका दंडाधिकारी, सर्व शासकीय व सर्व निमशासकीय कार्यालये, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, आत्मदहन इत्यादी विविध प्रकारची आंदोलने करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बध घालण्यात आले आहेत. ३ डिसेंबर २०२५ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील.
*****
धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था,
सार्वजनिक ठिकाणांच्या जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध
लातूर, दि. 14 : राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा व रेणापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशानुसार निर्गमित केलेले हे आदेश ३ डिसेंबर २०२५ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील.
*****
निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर
पक्ष प्रचाराचे कापडी फलके, झेंडे लावणे इत्यादी बाबीस प्रतिबंध
लातूर, दि. 14 : राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा व रेणापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यादिवशीपासून निवडणूक कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
या नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रासह या निवडणुकीवर प्रभाव पडणाऱ्या लगतच्या ग्रामीण क्षेत्रात वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.
त्यानुसार फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुनेच लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशानुसार निर्गमित केलेले हे आदेश ३ डिसेंबर २०२५ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील.
*****
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध लागू
लातूर, दि. 14 : राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा व रेणापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या निवडणुका विना अडथळा व शांततेत पार पडण्यासाठी निवडणुकीच्या काळात ध्वनीक्षेपक (लाउडस्पीकर) वापरावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केला आहे.
कोणत्याही वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी 6 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी यांची रीतसर परवानगी घेवून करता येईल. फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, विशिष्ट ठिकाणी थांबूनच ध्वनीक्षेपकाचा वापर करावा. सर्व राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार किंवा इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
*****
सार्वजनिक इमारतींच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर,
रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी निर्बंध
लातूर, दि. 14 : राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा व रेणापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. या काळातराजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवरांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीच्यासंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊटस, होर्डींग्ज, कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकतो. तसेच त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 अन्वये निवडणूकीचे सर्व साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
****
खाजगी व्यक्तीच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे,
भितीपत्रके लावण्यास निर्बंध
लातूर, दि. 14 : राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा व रेणापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.
त्यानुसार निवडणूक क्षेत्रात व निवडणुकीवर प्रभाव पडणाऱ्या लगतच्या ग्रामीण क्षेत्रात निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत आदी ठिकाणांच्या संबंधित जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत अंमलात राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****
शासकीय कार्यालये, विश्रामगृहे परिसरात
मिरवणूका, घोषणा, उपोषण, सभा घेण्यावर निर्बंध
लातूर, दि. 14 : राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा व रेणापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.
त्यानुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालये, विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणूका घोषणा देणे, सभा घेणे इत्यादीवर निर्बंध घातले आहेत.
****

