• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

संजय बनसोडे साहेब बळी तो कान पिळी! ही भुमिका योग्य नव्हे…!!!

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
December 28, 2025
in Blog
0
0
SHARES
292
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी आणि पुतण्यांचा उद्धार —
संजय बनसोडेंच्या राजकारणाचा पूर्व भागातला पहिलाच धक्का…!

लातूर | प्रतिनिधी

“बळी तो कान पिळी” ही म्हण राजकारणात सर्वश्रुत आहे. तळे राखणारा पाणी पिणार, हेही मान्य. मात्र गरिबीतून संघर्ष करत मोठ्या पदावर पोहोचलेल्या नेत्याने गरिबीची, कष्टाची आणि निष्ठेची जाणीव ठेवावी, ही अपेक्षा असते. पण तीच अपेक्षा संजय बनसोडे यांच्या बाबतीत फोल ठरताना दिसते आहे.

लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक असलेल्या पूर्व भागातच निष्ठावंत सामान्य कार्यकर्त्यांचा पहिला बळी घेतला गेला असून तो बळी खुद्द माजी मंत्री संजय बनसोडेंनी घेतला आहे, अशी तीव्र चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

प्रभाग ३ : निष्ठा बाजूला, नातेसंबंध पुढे

प्रभाग क्रमांक ३ मध्ये गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणारे, निवडणुकीची तयारी करणारे आणि संजय बनसोडेंचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राहुल बनसोडे यांना थेट डावलण्यात आले.
त्याऐवजी पुतणे मयूर बनसोडे आणि नुकतेच काँग्रेसमधून आलेले, संजय बनसोडेंचे आर्थिक व्यवहार पाहणारे राम चलवाड यांना झुकते माप देण्यात आले.

राजकीय निष्ठेपेक्षा नातेसंबंध आणि व्यवहारिक जवळीक अधिक महत्त्वाची ठरते आहे, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

आरक्षण असूनही न्याय नाही

प्रभाग ३ मध्ये

  • एससी महिला
  • ओबीसी पुरुष
  • खुला पुरुष
  • खुली महिला

अशी आरक्षण रचना असताना, खुल्या प्रवर्गातून राहुल बनसोडे यांना उमेदवारी देऊन सामान्य कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश देता आला असता.
इतकेच नव्हे तर तडजोड म्हणून त्यांच्या पत्नी रेखा बनसोडे यांचीही उमेदवारी मागण्यात आली होती.
मात्र त्या दोन्ही शक्यता धुडकावून लावत, घरातीलच उमेदवारांना पुढे रेटण्यात आले.

बाहेरून आलेल्यांना रेड कार्पेट

काल शिवसेनेतून सुनील बसपुरे आणि बालाजी जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. जातीय व प्रवर्गीय गणित जुळवताना, नुकतेच पक्षात आलेले लोक पात्र ठरतात; पण १५ वर्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता अपात्र ठरतो, हे कोणते राजकारण?

राम चलवाड हे काँग्रेसमधून आलेले असतानाही त्यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. कारण ते नातेवाईक नाहीत तरी आर्थिकदृष्ट्या अत्यंत निकटचे आहेत, अशी उघड चर्चा आहे.

सामान्य कार्यकर्त्यांसाठी पक्ष आहे की घरासाठी?

संजय बनसोडे स्वतः सामान्य कार्यकर्त्यातून आमदार आणि मंत्री झाले. मग आज तेच प्रस्थापितांसारखे वागत असतील, घरातील पुतण्यांसाठी निष्ठावंतांचा बळी देत असतील, तर सामान्य कार्यकर्त्यांनी नेमके काय करायचे?

पक्षासाठी झटायचे?
की घराणेशाही मान्य करायची?
की मग राजकारण सोडून व्यवहार सांभाळायचा?

हा प्रश्न आज पूर्व भागातल्या प्रत्येक सामान्य राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या मनात उभा आहे.

न्याय भाषणात, अन्याय यादीत

“सामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊ” ही घोषणा फक्त व्यासपीठापुरतीच आहे का?
निष्ठा, संघर्ष आणि पक्षासाठी दिलेली १५ वर्षे यांची किंमत शून्य ठरते का?

आज राहुल बनसोडे डावलले गेले; उद्या कोण?
हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण पक्ष संघटनेच्या आत्म्याचा आहे.

घराणे शाही ठरेल धोक्याची घंटा…

लातूरच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीच्या आगमनाने निवडणूक चुरशीची झाली असली, तरी स्वतःच्याच घरात निष्ठावंतांचा बळी देण्याची सुरुवात राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

आज हा बळी पूर्व भागात गेला आहे.
उद्या त्याचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले,
तर जबाबदारी कोणाची?

Previous Post

अग्रलेख —

Next Post

बाबा आमटे जीवन गौरव व सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार 2026 ची घोषणा

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

बाबा आमटे जीवन गौरव व सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार 2026 ची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved