• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

बाबा आमटे जीवन गौरव व सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार 2026 ची घोषणा

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
December 28, 2025
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  


आनंदवन दि. 26 थोर समाजसेवक पद्मविभुषण
श्रमर्षी बाबा आमटे यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून देशातील युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सदभावना निर्माण व्हावी यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर (1985) व अरुणाचल प्रदेश (इटानगर) ते गुजरात (ओखा) (1989) या दोन "भारत जोडो सायकल अभियानाची" 14000 कि. मी. ची सायकल यात्रा श्रमर्षी बाबा आमटे याच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. या ऐतिहासिक उपक्रमामध्ये देशातील सर्व राज्यातून शेकडो तरुणीनी प्रत्यक्ष कृतिशील सहभाग नोंदवला. त्यातील देशातील सहभागी तरुणांनी "बाबा आमटे एकता अभियान" या राष्ट्रीय पातळीवारील ट्रस्ट ची स्थापना केली. त्यांच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, वंचित सर्वसामान्याच्या उत्थानासाठी, कृषी व युवकांच्या मध्ये सामाजिक स्वास्थ्य, कुष्ठ रोगी सेवा या क्षेत्रात निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना 2022 पासून दर वर्षी बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार व मागील दोन वर्षांपासून बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार अशा दोन पुरस्काराची बाबा आमटे यांच्या जयंती दिनी 26 डिसेंबर रोजी जाहीर केले जातात व 9 फेब्रुवारी बाबा आमटे स्मृतिदिनी ते वितरित केले जातात.


या वर्षीच्या बाबा आमटे जीवन गौरव पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध गांधीवादी विचाराने प्रेरित संघर्षशील कार्यकर्ता, बाबा आमटे याच्या नेतृवात निघालेल्या भारत जोडो सायकल अभियानाचे पश्चिम बंगाल व पुर्वांचल चे समन्वयक म्हणून ज्यांनी महत्वाची भूमिका बाजावली, भारत पाकिस्तान मैत्री संबंधवार गजलेल्या पुस्तकाचे लेखक, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आणि सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असलेले ओमप्रकाश पी शहा कलकत्ता (पश्चिम बंगाल) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह शाल असे आहे.
यागोदर हा पुरस्कार थोर सर्वोदयी कार्यकर्ते, लोक सेवक संघांचे महासचिव सत्यपाल ग्रोवर (नवी दिल्ली), दक्षिण भारतातील गांधीवादी विचाराचे प्रचारक आर सुंदरेशन मदुराई (तामिळनाडू), युवक क्रांती दलाचे नेते, गांधी स्मारक निधीचे प्रमुख डॉ. कुमार सप्तर्षी, पुणे (महाराष्ट्र) यांना प्रदान करण्यात आले आहेत.
बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार 2026 साठी ज्यांनी साधनाताई, बाबा आमटे, एस एन सुब्बाराव, यदुनाथ थत्ते, डॉ. बाबा आढाव, डॉ. जे. एम. वाघमारे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आपले प्रेरणास्तोत्र मानून सुरुवातीला राष्ट्र सेवा दल, छात्र भारती च्या माध्यमातून विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रश्न सोडवणे, अंधश्रद्धा निर्मूलन, अंतरजातीय सत्यशोधकी विवाह, रक्तदान, आवयव दान, देहदान, प्रबोधन, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार प्रसार,, भूत भानामती, बुवाबाजी विरुद्ध संघर्ष, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, मनवतावाद, या क्षेत्रात सातत्याने कृतिशील असलेले शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विद्यमान राज्य अध्यक्ष, भारत जोडो युवा अकादमी चे सचिव, भारत जोडो सायकल यात्री माधव बावगे लातूर, (महाराष्ट्र) याची निवड करण्यात साली आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रू. 51,000/- रोख, सन्मान पत्र, सन्मानचिन्ह, शाल असे आहे.
या दोन्ही पुरस्काराची घोषणा श्रमर्षी बाबा आमटे यांच्या 111 व्या जयंती दिनी आनंदवनात डॉ. विकास आमटे याच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ रोडे, सेक्रेटरी डॉ. अशोक बेलखोडे, कोषाध्यक्ष गिरीश पद्मावार यांनी केली यावेळी डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू गुरुजी, राजेश ताजने, शकील पटेल उपस्थित होते.
हॆ दोन्ही पुरस्काराचे वितरण श्रमर्षी बाबा आमटे यांच्या स्मृतिदिना निमित्त फेब्रुवारी मध्ये मान्यवारांच्या हस्ते केले जाणार आहे असे संस्था सचिव डॉ. अशोक बेलखोडे यांनी सांगितले.
Previous Post

संजय बनसोडे साहेब बळी तो कान पिळी! ही भुमिका योग्य नव्हे…!!!

Next Post

🔥लातूर मनपा निवडणुकीत ‘पारदर्शकतेचा फज्जा’

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

🔥लातूर मनपा निवडणुकीत ‘पारदर्शकतेचा फज्जा’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved