• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

गवळी समाजाच्या दुधाभिषेकाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेचा शुभारंभ

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
May 10, 2026
in Blog
0
गवळी समाजाच्या दुधाभिषेकाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेचा शुभारंभ
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

दर्शनासाठी भाविकांच्या मध्यरात्रीपासूनच रांगा

हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला

  लातूर /प्रतिनिधी : शनिवार व रविवारच्या मध्यरात्री गवळी समाजाच्या वतीने लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक करण्यात आला.परंपरेप्रमाणे या दुग्धाभिषेकानंतर महाशिवरात्री यात्रेचा शुभारंभ झाला. सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी लातूर व पंचक्रोशीतील भाविकांनी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. सकाळी जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
  यावेळी दिवाणी न्यायाधीश गोटे व धर्मादाय सह आयुक्त राजेश सासणे, प्रशासक सचिन जांबुतकर आणि विश्वस्त उपस्थित होते.
  लातूरसह सीमावर्ती भागात सिद्धेश्वरांची महाशिवरात्री यात्रा प्रसिद्ध आहे.या कालावधीत सिद्धेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी तसेच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी लाखो भक्त लातूर येथे येत असतात. शिवरात्रीपासून यात्रेला प्रारंभ होतो.
  दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीने मध्यरात्री वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढत मंदिरात येऊन श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश गोटे, सह धर्मादाय आयुक्त राजेश सासणे व प्रशासक सचिन जांबुतकर, ईशानी घुगे यांच्यासह ज्येष्ठ विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे,श्रीनिवास लाहोटी,अशोक भोसले, बाबासाहेब कोरे,नरेश पंड्या,सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह दिसेन, मन्मथ लोखंडे, चंद्रकांत परदेशी, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महापूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त मंडळाकडून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
 दरवर्षीप्रमाणेच श्री सिद्धेश्वरांच्या दर्शवण्यासाठी भक्तांनी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. ” हर हर महादेव’चा जयघोष करीत भाविक-भक्त रांगा लावून दर्शन घेत होते.भक्तांना दर्शन घेण्यात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.दर्शन रांगा तसेच भक्तांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते.दर्शन रांगेमध्ये आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या तर उपचारासाठी वैद्यकीय पथकही तत्पर होते. देवस्थान व भालचंद्र रक्तपेढीच्या सहकार्यातून रक्तदान करणाऱ्यांना थेट दर्शन देण्याचा उपक्रम यावर्षीही राबविण्यात आला.या शिबिराला दर्शनासाठी येणारे भक्त,नागरिक व युवकांनी मोठा प्रतिसाद दिला.
  यात्रा कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यात्रा कालावधीत विविध सोयी- सुविधा पुरविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनेही व्यवस्था करण्यात आली आहे.

Previous Post

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे शुभहस्ते  रेणा साखर कारखाना येथे 4,21,111 व्या साखर पोत्याचे पुजन  संपन्न

Next Post

लातूरच्या औद्योगिक वाढीमुळे दर्जेदार सुविधांची गरज: मयूर गर्जे

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post
लातूरच्या औद्योगिक वाढीमुळे दर्जेदार सुविधांची गरज: मयूर गर्जे

लातूरच्या औद्योगिक वाढीमुळे दर्जेदार सुविधांची गरज: मयूर गर्जे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 16, 2026

स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळावे

June 15, 2026

Recent News

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 16, 2026

स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळावे

June 15, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved