
लातूर : लातूर विभागीय महसूल आयुक्त कार्यालय निर्माण कृती समिती, लातूर आणि लातूर जिल्हा वकील मंडळ, लातूर यांच्या वतीने दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापण करण्यासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी मागणी न्यायाची ! लढाई हक्काची !! बाजू गुणवत्तेची !!! निर्धार संघर्षाचा ! विचार मराठवाड्याच्या समतोल विकासाचा !!लातूर येथेच”विभागीय महसूल आयुक्तालय स्थापन करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

मराठवाड्यात स्वतंत्र्य महसुल आयुक्त कार्यालय स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने यापुर्वीच घेतलेला आहे. काही वर्षापुर्वी नांदेड येथे आयुक्त कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळाने घेतला होता, या निर्णयाच्या विरोधात लातूरकरांनी तिव्र संघर्ष केला. मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) खंडपीठात याचीका दाखल करण्यात आल्या होत्या. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडातील आयुक्तालयाबाबत शासन आदेश (शुध्दीपत्र) दि. १६/०२/२०१५ रोजी नुसार, “विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबादचे विभाजन करून नव्याने निर्माण करावयाच्या विभागीय आयुक्तालयात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश असावा व त्याचे मुख्यालय कोठे असावे या सर्व बाबींचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी एक सदस्यीय अभ्यासगठ गठीत केलेला होता.” एक सदस्यीय अभ्यासगटाचे प्रमुख श्री. उमाकांत दांगट यांनी महाराष्ट्र शासनास मराठवाड्यातील दुसरे विभागीय महसुल कार्यालय स्थापनेबाबत अहवाल दिलेला आहे.

लातूर येथे १९८५ पासूनच विवीध विभागीय कार्यालयाची सुरूवात झ गाली असून आज घडीला लातूर येथे तब्बल ३६ विभागीय कार्यालय कार्यरत असून या कार्यालयाशी मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशीव (उस्मानाबाद), नांदेड, हिंगोली आणि परभणी हे जिल्हे जोडले गेलेले आहेत. दि. १९/०९/२०११ रोजी सार्वजनीक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांनी लातूर येथे विभागीय कार्यालयासाठी प्रशासकीय इमारतीस मान्यता दिली आणि दहा वर्षापुर्वीच या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे, ही अद्यावत वास्तु बार्शी रोड येथे आहे. गुणवत्तेच्या आधारावर आणि सर्वसामान्य नागरीकांच्या सोईच्या दृष्टीकोणातून लातूर येथेच विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करणे योग्य आहे. परंतू काही दिवसापुर्वी मा. महसूल मंत्री यांनी नांदेड येथे कार्यक्रमात नांदेड बाबत अनुकुल वक्तव्य केल्यामुळे लातूर, बीड, धाराशीव (उस्मानाबाद), येथील नागरीकांत संभ्रम निर्माण झाला आहे, म्हणून या निवेदनाद्वारे आपणास विनंती करण्यात येते की, महाराष्ट्रशासनाने एक सदस्यीय अभ्यासगट समीतीने लातूर येथे आयुक्तालय स्थापनेसाठी सकारात्मक शिफारस केली असल्यामुळे आणि मराठवाड्याच्या सर्वांगीन विकासाठी लातूर येथेच मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र्य विभागीय महसुल आयुक्त कार्यालय स्थापन करावे, अशी विनंती आंदोलनकर त्याच्या वतीने करण्यात आली आहे या आंदोलनातलातूर विभागीय महसुल आयुक्त कार्यालय निर्माण कृतीसमिती, लातूर,लातूर जिल्हा वकील मंडळ, लातूर चे निमंत्रक अॅड. उदय गवारे कार्याध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, अॅड. बळवंत जाधव,सदस्य, वकील परिषद अॅड. अण्णाराव पाटील,अध्यक्ष, वकील मंडळअॅड. शरद इंगळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते

