Blog

Your blog category

जागतिक चिमणी दिवस – चिमणी आणि पर्यावरणाचे महत्त्व

( जागतिक चिमणी दिनानिमित्त लातूरचे ख्यातनाम छायाचित्रकार धनंजय गुट्टे यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा छान फोटो टाकले आणि हा लेख आपल्या...

Read more

लातूरकरांना ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा – प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा कळस!

लातूर शहरातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईच्या दाहकतेला तोंड देत आहेत. आधी पिवळट आणि आता चक्क काळं पाणी नळाद्वारे पुरवले...

Read more

महाबँक व्यवस्थापन आजच्या संपातून सुद्धा* *आडमुठेच राहिले तर आंदोलन उग्र करून बेमुदत* *संप करावा लागेल कॉ. धनंजय कुलकर्णी. 

लातूर दिनांक 20: "मागील तीन ते चार वर्षापासून सातत्याने निवेदने, धरणे आंदोलने, निदर्शने तसेच अनेक वेळा संप करून सुद्धा आवश्यक...

Read more

महाबँक व्यवस्थापन आजच्या संपातून सुद्धा आडमुठेच राहिले तर आंदोलन उग्र करून बेमुदत संप करावा लागेल.………….. कॉ. धनंजय कुलकर्णी.लातूर दिनांक 20: “मागील तीन ते चार वर्षापासून सातत्याने निवेदने, धरणे आंदोलने, निदर्शने तसेच अनेक वेळा संप करून सुद्धा आवश्यक तितक्या प्रमाणात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सर्व संवर्गात नोकर भरती होत नाही. बँक ऑफ महाराष्ट्र चे वरिष्ठ व्यवस्थापन अहंकारयुक्त दर्पाने आंधळे, मुके आणि बहिरे झाले आहे. यांना बँकेच्या उच्च परंपरा,बँकेचे मालक असलेली जनता आणि ग्राहकांचे होणारे हाल, अपुऱ्या कर्मचारी अधिकारी वर्गामुळे त्यांच्या वरील तणाव याकडे मुजोरपने दुर्लक्ष देवून आपल्याच मस्तीत वागत आहे. त्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्र बँकेतील संघटनेस बेमुदत संप सुद्धा करावा लागला तर त्यास जबाबदार बँकेचे चेअरमन आणि वरिष्ठ व्यवस्थापन जबाबदार असेल,” असा इशारा महाबँक कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिला.आज या बँकेत एक दिवसाचा इशारा संप लातूर शहरात कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून पूर्ण यशस्वी केला. त्यावेळी निदर्शक बँक कर्मचाऱ्यापुढे बोलताना पुढे ते म्हणाले की,”अपुऱ्या कर्मचारी अधिकारी संख्येचा विपरीत तात्काळ परिणाम ग्राहक सेवे वरती होताना दिसून येतो आहे. ग्राहकांना अनेक वेळ ताटकळत रांगेत उभारावे लागत आहे. बँक गेली अनेक वर्षे प्रचंड नफा कमावून उत्कृष्ट कामगिरी करीत आहे, मग या नफ्याच्या बदल्यात ज्या ग्राहकांच्या जीवावर हा नफा कमावला जातो, त्या ग्राहकांना निकृष्ट सेवा देण्याचे दुष्ट धोरण, शोषण करणारे धोरण बँक व्यवस्थापनाने अवलंबीने, हा ग्राहकांचा अवमान आणि कृतघ्नपणा आहे. त्यामुळे उत्कृष्ट सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ग्राहक सेवेचे बारा वाजलेले आहेत. त्यामुळेच “ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र फेडरेशन” या ए आय बी ई ए शी संलग्न असलेल्या संघटनेने बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकर भरती या प्रमुख मागणी साठी 20 मार्च 2025 रोजी संपाची हाक दिली असल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या आजारपणासाठी,प्रमुख सांसारीक व आवश्यक गरजांसाठी रजा मिळत नाहीत. अनेक शाखा मध्ये शिपाई नाहीत.त्यामुळे तेथील शिपायांची कामे कंत्राटी पद्धतीने करून घेतली जातात, जे ग्राहकांच्या ठेवीदारांना धोकादायक आहे.मागील दहा वर्षात अनेक नवीन शाखा उघडल्या गेल्या व बँकेचा व्यवसाय ही अनेक पटीने वाढलेला आहे परंतु कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाल्याचे दिसून येते आहे.ऑल इंडिया फेडरेशनने तात्काळ नोकर भरतीची मागणी केलेली आहे त्यासाठी आजचा संप अटळ बनल्याचेही” कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

बँकेचे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने बँक चालवू पाहतआहे.संघटनासोबत केलेल्या करारांचे पालन बँकेकडून केले जात नाही. संघटनांचे ताब्यात घेतलेले ऑफिसेस सुद्धा बँकेच्या...

Read more

अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेच्या उद्घाटकांचा गौरव – कला आणि श्रद्धेचा अनोखा संगम

वर्धा, 19 जानेवारी 2025 – अंबानगर, वर्धा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेचे उद्घाटन एम.एस.आर.डी.सी.चे व्यवस्थापकीय संचालक आणि...

Read more

परिमंडळातील लघुदाब वर्गवारीतील चार लाख ३३ हजार वीजग्राहकांकडे चालू बिलासह ४१४ कोटींची थकबाकी

बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू लातूर, प्रतिनिधीः मार्च अखेर निर्धारीत केलेले वीजबील वसुलीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वीजबिलांच्या...

Read more

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि बौद्ध समाजाचे राजकीय संघटन

- दिपरत्न निलंगेकर महाबोधी महाविहार, बोधगया हे जागतिक बौद्धांचे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तथागत गौतम बुद्ध यांना येथेच ज्ञानप्राप्ती झाली...

Read more

सामाजिक कार्यकर्ते शरद झरे यांना महाराष्ट्र लोकविकास मंचचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून महाराष्ट्रातील नामांकित समाजसेवकांसोबत लातूर जिल्ह्यातील माणूस प्रतिष्ठान संचलित माझं घर प्रकल्पाचे प्रमुख शरद केशवराव झरे यांचा समावेश आहे.महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार शरद झरे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा कळंब येथे २३ मार्च रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शरद झरे यांनी पर्यावरण, वृक्षारोपण चळवळ तसेच शिक्षणापासून वंचित मुलांसाठी भरीव असे योगदान दिले आहे. लातूर जिल्ह्यात ऑक्सिजन ग्रुपच्या माध्यमातून पहिली वृक्षारोपण चळवळ राबवून जिल्ह्यात पाच लक्ष  वृक्षांची लागवड त्यांनी केली आहे. सध्या माझं घर प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातील शिक्षणापासून वंचित मुलामुलींचा सांभाळ ते करत आहेत. महात्मा गांधीच्या नई तालीम या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या प्रकल्पात मुलांना भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शरद झरे स्वावलंबनाचे धडे शिकवत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे. 

Read more

भारतीय शेतीचा बदलता चेहरा आणि उपाययोजना

भारताच्या कृषी क्षेत्रात गेल्या काही दशकांत मोठे बदल घडले आहेत. यंत्रिकीकरण, गुंतवणूकदारांची वाढती उपस्थिती, सरकारच्या धोरणांचे बदल, आणि शेतकऱ्यांच्या जीवनशैलीतील...

Read more

डॉ, बाबासाहेब आंबेडकर सेवानिवृत्त कर्मचारी जयंती समितीच्या अध्यक्षपदी बलभीम कोथिंबिरे

लातूर, दिनांक 16:भारतीय घटनेचे शिल्पकार पं, पू, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यन्त उत्साहात साजरी करण्यासाठी मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ...

Read more
Page 51 of 65 1 50 51 52 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News