दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

📰 नागरी हक्काची मागणी — लातूर महापालिकेकडे भाजपकडून निवेदन

लातूर, ४ ऑगस्ट २०२५ भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने प्रभाग क्र. ०३ व ०५ मधील नागरी सुविधांबाबत तातडीने...

🚨 कामावरून अचानक काढून टाकल्याने १०७ सुरक्षारक्षकांचा उद्रेक!🔥 लातूरमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा; माजी सैनिक, महिलांची प्रचंड घुसमट

📍 लातूर, 1 ऑगस्ट 2025विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे १२ वर्षांपासून निष्ठेने सेवा करणाऱ्या १०७ सुरक्षारक्षकांना...

दयानंद कला महाविद्यालयात ‘एक तास निरोगी आरोग्यासाठी – आनंदी शनिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला

लातूर, दि. ०२ ऑगस्ट २०२५ :राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ‘एक तास निरोगी आरोग्यासाठी - आनंदी शनिवार’ या आरोग्यवर्धक उपक्रमाचे...

अख्खं सेवालयचं जेल भोगतंय…

महारुद्र मंगनाळे. ……………………………………….. मी शरीराने सेवालयात आणि मनाने लातूरच्या जेलमध्ये वावरतोय. काल आठ दिवस झाले. उठल्याबरोबर माझी परिक्षा सुरू होते....

माळरानावर फुललेलं नंदनवन – पण आता प्रश्नचिन्हांसमोर!

✍🏻 दीपरत्ना निलंगेकर लातूर जिल्ह्यातील हासेगावच्या माळरानावर उभं राहिलेलं ‘सेवालय’ हे केवळ बालगृह नाही, ते एका ध्येयवेड्या तरुणाच्या आयुष्याचं, त्याच्या...

चळवळीचे प्रेरणास्थान अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे हे जगातील एकमेव साहित्यिक ठरले आहेत की ज्यांच्या नावाने चळवळीचा उदय झालेला आहे.अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक तर होतेच...

हेलिकॉप्टर पंढरपूर समजून उतरवले तुळजापुरात; पोलीस, महसूल, बांधकाम प्रशासनाची धावपळ!

तुळजापूर :- हैदराबादहून पंढरपूरच्या दिशेने निघालेले मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी चुकून थेट तुळजापुरात उतरल्याने प्रशासनात एकच खळबळ...

Page 18 of 65 1 17 18 19 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News