दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

मराठवाड्याच्या आतिथ्य सुविधांना बळकटी देत ‘एनराइज बाय सयाजी’चे लातूरच्या एमआयडीसी परिसरात उद्घाटन

~ लातूरमधील ‘एनराइज बाय सयाजी’मध्ये 30 खोल्या, प्रशस्त बँक्वेट हॉल्स आणि आधुनिक भोजन व्यवस्था – औद्योगिक पट्ट्याच्या मध्यवर्ती ठिकाणी समकालीन...

देवणी निवडणूक भत्ता प्रकरण : कर्मचाऱ्यांचा घाम, अधिकाऱ्यांचा घोटाळा?

लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांवर अन्याय — चौकशीची जोरदार मागणी देवणी :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अहोरात्र मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निवडणूक...

महापौर उपमहापौर बिनविरोध

लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी काँग्रेसच्या जयश्री भालचंद्र सोनकांबळे यांची तर उपमहापौरपदी ॲड.स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड आज झाली. निवडीच्या...

लट्टालूर ते खिद्रापूर : राष्ट्रकूट–शिलाहार संबंधांचा ऐतिहासिक सेतू

मागच्या महिन्यात मी खिद्रापूरचे सहकुटुंब पाहून आलो… अत्यंत देखणे, माझे तिथून पाय निघत नव्हते… आणि ऐतिहासिक गोष्टी पोटात घेवून हे...

जवळग्यात नेतृत्वाचा उदय : विकासाचा ध्वज हाती घेणारे कालिदास माने

जवळगा जिल्हा परिषद गटातील निवडणूक ही केवळ मतांची लढाई नाही, तर नेतृत्वाची कसोटी आहे. या कसोटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कालिदास...

क्लिअरन्स अभावी मंत्र्यांचे विमान अडकले; लातूर विमानतळाच्या अपूर्ण सुविधांवर पुन्हा प्रश्नचिन्ह!

लातूर | प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना घेऊन जाणारे विमान लातूर विमानतळावरच अडकले. आवश्यक तांत्रिक व...

काय म्हणते लातूर… बदलते लातूर…स्व. विलासराव देशमुख, बाळासाहेब आंबेडकर यांचा जादुई चमत्कार…

महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक ओळख नाही, तर तो एका वैचारिक प्रवाहाचा वारसा आहे. संत परंपरेपासून फुले–शाहू–आंबेडकरांपर्यंत समाजसुधारणेचा जो प्रवाह वाहत...

लातूर जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थिनी मृत्यू प्रकरनी एस आय टी नियुक्त पोलिस अधीक्षक पत्रकार परिषद

जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथील विद्यार्थिनी कु. अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे पत्रकार...

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यासपुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

मुंबई, दि. 15: बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर...

लातूर महानगरपालिका निवडणूक मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर, दि. १४ : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त १५ जानेवारी २०२६ शांतता, निर्भयता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा...

Page 4 of 72 1 3 4 5 72
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News