दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

जिल्हाधिका-यांच्या पत्रास दाखविली कचराकुंडी अतिक्रमण मान्य करत लेखी आश्वासन देऊनही मनपा आयुक्त कार्यवाहीस का कचरत असावेत?

लातूर, दि.०७, येथील स्वामी विवेकानंद चौक ते सिद्धेश्वर चौक या सरकारी सार्वजनिक रस्त्यामध्ये, कांही लोकांनी केलेले ते बेकायदा अतिक्रमण मान्य...

जिल्हाधिका-यांच्या पत्रास दाखविली कचराकुंडी———————————————-अतिक्रमण मान्य करत लेखी आश्वासन देऊनहीमनपा आयुक्त कार्यवाहीस का कचरत असावेत?————————————————धरणे-आंदोलनार्थींचा संतप्त जाहीर सवाल !लातूर, दि.०७, येथील स्वामी विवेकानंद चौक ते सिद्धेश्वर चौक या सरकारी सार्वजनिक रस्त्यामध्ये, कांही लोकांनी केलेले ते बेकायदा अतिक्रमण मान्य करूनही ते न काढता, मा. जिल्हाधिका-यांच्या आदेशा सह स्वतःच्याच लेखी आश्वासनासही कचराकुंडी दाखविणारे, मनपा आयुक्त हे प्रत्यक्ष कायदेशीर कार्यवाही करण्यास कचरतातच कसे ? असा जाहीर उद्वीग्न प्रश्न उपस्थित करून, या मार्ग मुक्तीसाठी ७ मार्च पासून अन्याग्रस्त कार्यकर्त्यांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयावर, पुनःश्च आपले बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.या बहुचर्चित अतिक्रमणाची संक्षिप्त माहिती अशी की, लातूर मनपा हद्दीमधील विवेकानंद ते सिध्देश्वर चौक शासकीय रस्त्यामध्ये, कृपासदन रोड जवळ दक्षिण व उत्तर बाजूनी ६ लोकांनी जब्बरदस्ती ने कच्चे अतिक्रमण केले आहे. म्हणून आजपर्यंत येथे पक्या नाल्या व रोड होऊ शकला नाही. त्यामुळे पावसासह या भागातील नित्य सांडपाण्याचा निचरा होत नाही. म्हणून या दलदल व दुर्गंधीमुळे, येथे सतत आरोग्य व रोगराईचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. याशिवाय शहराच्या मूळ गावभागात जाणारा, हा अत्यंत एक महत्वाचा प्रमुख पर्यायी रस्ता आहे. त्यामुळे पादचारी व वाहन धारकांची मोठी अडचण झाली आहे. सदर गैर अतिक्रमण हटवावे म्हणून, कांही नागरिक हे गेली २०-२२ वर्षे प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर ते अतिक्रमण २-३ वेळा हटविले गेले होते. मात्र मनपा ही त्याचवेळी तेथे पक्या नाली व रोड करत नसल्याने, ते अतिक्रमित पुन्हा परत रस्त्यावर पूर्ववत येतात. हे अतिक्रमित सुशिक्षित सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी या रस्त्यामध्ये कम्पाऊंड वालसह खाजगी गटारी, संडास टँक, पत्र्यांच्या शेडचे पानमहल बनविले असून, त्याचे ते खुशाल जाहीरपणे भाडेही खातात.मा. राज्य शासनाच्या चालू अधिवेशन काळात, या अशा मनमानी अन्याविरुद्ध, ” सार्वजनिक सरकारी रस्ता बचाओ नागरी कृती समितीच्या “वतीने जुलै २०२४ पासून, नागरिकांचा रितसर संघर्ष चालू आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी मनप प्रशासनास ७-८ पत्र दिली. मनपाने वारंवार पाहणी करून, हे अतिक्रमण झाल्याचे लेखी मान्य केले. तरी पण स्वतः कांही ते काढत नाहीत. म्हणून शेवटी ६ जानेवारीस नागरिकांनी, मा. जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे- आंदोलन सुरु केले. तेव्हा २४ जानेवारीस मनपा आयुक्तांनी अवध्या १५ दिवसात हे अतिक्रमण हटविण्याचे, मा. जिल्हाधिकारी यांना व सत्याग्रहीना स्वतंत्र पत्राव्दारे लेखी आश्वासन दिले. त्यावर मा. जिल्हाधिकारी यांनी पण आंदोलनार्थीना एक लेखी पत्र दिले. त्यामुळे १९ व्या दिवशी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. दरम्यान मनपाने सदर रोडचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण केले. मात्र नेमके त्या अतिक्रमणाच्या ठिकाणचे अंदाजे ३० टक्के काम तसेच ठेवले. पाहणी, चर्चा व बैठकांचे सोपस्कारही उरकले. मात्र मनपाने अखेर ते अतिक्रमण काही काढले नाही. आणि तेथे नाल्या व रोडपण केलाच नाही. त्यांनी नेहमीच्याच त्यांच्या टाळाटाळ व अक्षम्य दिरंगाईचा पाढा काही सोडलाच नाही.त्यांच्या लेखी आश्वासन दीड महिना लोटला. शेवटी त्यांनी मा. जिल्हाधिका-यांच्या लेखी आदेशास व आयुक्तांच्या लेखी आश्वासनास, स्वतःच जाहीर हरताळ फासला. आणि नागरिकांची घोर फसवणूक केली. याचा जाहीर खेद व्यक्त करत, या रस्त्यामधील ते अतिक्रमण त्वरीती हटवून, तेथे उर्वरित पक्क्या नाल्या व रोड करावा म्हणून ७ मार्च रोजी सकाळी ११ वा. पासून, मा. जिल्हाधिकारी कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते रामकुमार रायवाडीकर यांनी, पुन्हा आपले बेमुदत धरणे- आंदोलन सुरु केले आहे. आणि त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री आदींना सादर केले आहे. रामकुमार रायवाडीकर यांच्या या सत्याग्रहात सक्रिय सहभागी होऊन, सूरज पाटील, वैजनाथ माने, पत्रकार शिरीषकुमार शेरखाने, रामदास ससाणे, बाबुराव झाकडे, बुद्धाजी कांबळे, रघुनाथ बेडदे, वलीभाई शेख, गणपतराव तेलंगे, संजय व्यवहारे, श्री श्याम प्रतापराय वरियाणी, पत्रकार बाळ होळीकर, प्रा. दिनकर कांबळे, बाबा शेख, श्री पंडितराव बंडे, अँड. डी एन भालेराव, माजी सरपंच श्री माधवराव गायकवाड, तिरभद्र इंदुलकर, जग्गनाथ सुरवसे, अगंदराव कांबळे, साथी अतिष नवगीरे, शत्रुघ्न कांबळे, सत्यभामा माने, भाऊसाहेब कांबळे, दत्तात्रय बेले, ऍड. मधुकर कांबळे, कॉ. दिगंबर सुर्यवंशीआदीनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.—————-प्रति, दि.०७/०३/२०२५महोदयकृपया वरील बेमुदत धरणे- आंदोलन वृत्त प्रसिद्ध करावे, ही नम्र विनंती.आपला विनित,- रामकुमार रायवाडीकर,लातूर.

लातूर मध्ये रोजगार मेळावा संपन्न: एंजल वन व राह फाउंडेशन आयोजित रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन …

लातूर,: एंजल वन च्या सहकार्याने राह फाऊंडेशन महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये रोजगार मेळावा आयोजित करत आहे. राह फाउंडेशन आणि स्वयंतेज अकॅडमी...

दुष्काळात पाण्याची टंचाई झेलणाऱ्या लातूरकरांना पिवळ्या पाण्याची शिक्षा

नळाद्वारे पिवळ्या पाण्याचा पुरवठा सुरुच शहर महानगरपालिका लातूर शहरात जे पाणी वितरण करत आहे ते पाणी पिवळे आहे. प्रारंभी नळ...

सोलापूर आगाराच्या अधिकारी , वाहकांचा उद्दामपणा

इलेक्ट्रिक बसमध्ये नियमानुसार असलेली सवलत देण्यास नकार  लातूर दि.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने एस.टी.बस प्रवासामध्ये प्रवाशांना विविध प्रकारच्या...

औसा खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांचे वर्चस्व कायमऔसा : औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक लागली असून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक संचालक पदाच्या जागेसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने व ते उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि.4) वैध ठरल्याने ही निवडणूक झाली आहे. औसा तालुका खरेदी विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांचे या संघावर वर्चस्व कायम राहिले आहे.औसा तालुका खरेदी विक्री संघाच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी ही निवडणूक जाहीर झाली होती. सोमवारी (दि.3 मार्च) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यामध्ये विद्यमान सभापती तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली 15 उमेदवाराचे उमेदवारी अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध …

या निवडणुकीमध्ये संस्था मतदारसंघातून संतोष ज्ञानोबा सोमवंशी, शिवाजी माधवराव हांडे, मारुती गोरखनाथ मगर, नंदकुमार नानासाहेब साळुंके, गणेश प्रल्हाद जाधव तर...

औसा खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांचे वर्चस्व कायमऔसा : औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक लागली असून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक संचालक पदाच्या जागेसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने व ते उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि.4) वैध ठरल्याने ही निवडणूक झाली आहे. औसा तालुका खरेदी विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांचे या संघावर वर्चस्व कायम राहिले आहे.औसा तालुका खरेदी विक्री संघाच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी ही निवडणूक जाहीर झाली होती. सोमवारी (दि.3 मार्च) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यामध्ये विद्यमान सभापती तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली 15 उमेदवाराचे उमेदवारी अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.

या निवडणुकीमध्ये संस्था मतदारसंघातून संतोष ज्ञानोबा सोमवंशी, शिवाजी माधवराव हांडे, मारुती गोरखनाथ मगर, नंदकुमार नानासाहेब साळुंके, गणेश प्रल्हाद जाधव तर...

औसा खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोधशिवसेना जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांचे वर्चस्व कायमऔसा : औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक लागली असून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक संचालक पदाच्या जागेसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने व ते उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि.4) वैध ठरल्याने ही निवडणूक झाली आहे. औसा तालुका खरेदी विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांचे या संघावर वर्चस्व कायम राहिले आहे.औसा तालुका खरेदी विक्री संघाच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी ही निवडणूक जाहीर झाली होती. सोमवारी (दि.3 मार्च) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यामध्ये विद्यमान सभापती तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली 15 उमेदवाराचे उमेदवारी अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध …

या निवडणुकीमध्ये संस्था मतदारसंघातून संतोष ज्ञानोबा सोमवंशी, शिवाजी माधवराव हांडे, मारुती गोरखनाथ मगर, नंदकुमार नानासाहेब साळुंके, गणेश प्रल्हाद जाधव तर...

सुरक्षेला प्राधान्यदेत ग्राहकाभिमूख सेवा द्या – मुख्य अभियंता अरविंद बुलबुले

लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करत लाईनमन दिवस उत्सहात साजरा लातूर, दि. ४मार्च : वीज सेवेच्या क्षेत्रातील लाईनमन हा महावितरणचा चेहरा आहे....

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्री बालाजी गवळी हे भूमिपुत्र सामाजिक बांधिलकी पुरस्काराने सन्मानित

लातूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचे विचारपीठ भूमिपुत्र स्वराज्य शिवयोध्दा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बहुजन प्रतिपालक जाणता राजा छत्रपती शिवाजी...

Page 57 of 65 1 56 57 58 65
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News